सध्या भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी अभिनेत्री आणि डान्स कोरियोग्राफर धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु आहेत. या दोघांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवरुन एकमेकाला नुस्त अनफॉलो नाही केलं तर एकमेकांसोबत असणाऱ्या पोस्ट देखील दोघांनी त्यांच्या सोशल मीडियावरून डिलिट केल्या आहेत. यादरम्यान आता चहल-धनश्रीच्या घटस्फोटाच्या चर्चांना युजवेंद्रच्या इन्स्टा स्टोरीने उधाण आणलं आहे.
त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर स्टोरीवर तुम्हाला तुमच्या वेदना माहीत आहेत, असं म्हणतं त्याच्या वेदना मांडण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येत आहेत. एवढं सगळ सुरु असताना आता सोशल मीडियावर चहलची एक व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
युझवेंद्र चहलची पोस्ट
युझवेंद्र चहल याने सोशल मीडियावर आपले भाव मांडले आहेत, त्याने इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे आणि म्हणाला आहे की, 'तुमची कठोर मेहनत तुमची ओळख तुमचे व्यक्तीमत्त्व ठरवते. तुम्हाला तुमचा प्रवास माहित आहे. तुम्हाला तुमच्या वेदना माहीत आहेत. इथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही काय कठोर परिश्रम घेतले हे देखील तुम्हाला माहीत आहे. जगाला माहीत आहे, तुम्ही मान ताठ ठेवा. तुम्ही तुमच्या वडील आणि आईला अभिमान वाटावा यासाठी तू खूप घाम गाळला आहे. त्यामुळे नेहमी एका अभिमानास्पद मुलाप्रमाणे खंबीर राहा.'
घटस्फोटाच्या अफवांना दिशा कशी मिळाली
भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि अभिनेत्री धनश्री वर्मा यांच 2020 साली लग्न झालं असून त्यांच्या लग्नाला आता जवळपास पाच वर्ष झाली असावीत. 2023 मध्ये धनश्रीने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवरून ‘चहल’हे नाव काढून टाकले होते. त्यानंतर चहलने देखील ‘नवीन जीवन लोड होत आहे’ अशी एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामुळे त्यांच्या नात्याला नवी दिशा मिळाली होती. यानंतर युजवेंद्र आणि धनश्री गेल्या काही महिन्यांपासून वेगळे राहत आहेत. यानंतर आता या दोघांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले तसेच चहलने त्याच्या अकाऊंटवरुन धनश्रीसोबतचे सर्व फोटो हटवले, त्यानंतर त्यांच्या विभक्त झाल्याच्या अफवा पसरू लागल्या.