क्रिकेट

Yuzvendra Chahal: चहलसोबत ती मिस्ट्री गर्ल कोण? मिस्ट्री गर्लसोबतचा व्हिडिओ व्हायरल

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्ये आता एका मिस्ट्री गर्लसोबतचा चहलचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मुंबईच्या हॉटेलमध्ये स्पॉट झालेला चहल आपला चेहरा लपवताना दिसला.

Published by : Prachi Nate

सध्या भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी अभिनेत्री आणि डान्स कोरियोग्राफर धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु आहेत. या दोघांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवरुन एकमेकाला नुस्त अनफॉलो नाही केलं तर एकमेकांसोबत असणाऱ्या पोस्ट देखील दोघांनी त्यांच्या सोशल मीडियावरून डिलिट केल्या आहेत. यादरम्यान आता चहल-धनश्रीच्या घटस्फोटाच्या चर्चांना युजवेंद्रच्या इन्स्टा स्टोरीने उधाण आणलं आहे.

घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर स्टोरीवर तुम्हाला तुमच्या वेदना माहीत आहेत, असं म्हणतं त्याच्या वेदना मांडण्याचा प्रयत्न देखील केल्याचं दिसून आलं आहे. एवढं सगळ सुरु असताना आता सोशल मीडियावर चहलची एक व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात तो एका मुलीसोबत मुंबईतील एका हॉटेलमध्ये दिसला होता.

मुंबईच्या हॉटेलमध्ये स्पॉट झालेला युझवेंद्र आपला चेहरा हाताने लपवण्याचा प्रयत्न करत होता. तर ती मिस्ट्री गर्ल देखील आपला चेहरा लपवताना दिसून आली. या व्हिडिओमध्ये चहलने पांढऱ्या रंगाचं ओव्हरसाईज टी-शर्ट आणि निळ्या रंगाची जिन्स परिधान केली आहे. ही मिस्ट्री गर्ल नेमकी कोण आहे असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे तर चहल आणि धनश्री यांच्या नात्याला आता फुलस्टॉप लागला असून या मुलीबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा