क्रीडा

Virat Kohli Dance: विराट कोहलीने केला डान्स, तिसऱ्या वनडेआधी मैदानावर स्विंग करताना दिसला, VIDEO

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या चांगली कामगिरी करताना दिसत आहे. गेल्या अडीच वर्षांपासून त्याला शतकही झळकावता आलेले नाही. मात्र यावेळीही विराट कोहलीची तीच कूल स्टाइल पाहायला मिळाली.

Published by : Siddhi Naringrekar

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या चांगली कामगिरी करताना दिसत आहे. गेल्या अडीच वर्षांपासून त्याला शतकही झळकावता आलेले नाही. मात्र यावेळीही विराट कोहलीची तीच कूल स्टाइल पाहायला मिळाली. तो क्रिकेटच्या मैदानावर डान्स करताना दिसला आहे. टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टरमध्ये झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी हा सर्व प्रकार घडला.

कोहलीच्या डान्सचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये कोहली ट्रॅक शूट परिधान करून सरावासाठी तयार दिसत आहे. व्हिडिओमध्ये तो पाणी पित डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये कोहली कुणाला तरी अंगठा दाखवताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तो कुणाला तरी चिडवत असल्याचा भास होत आहे.

विराट कोहली सध्या टीम इंडियासोबत इंग्लंड दौऱ्यावर आहे. विराट कोहलीला अडीच वर्षे आंतरराष्ट्रीय शतक आणि पाच महिने अर्धशतक झळकावता आलेले नाही. कोहलीने नोव्हेंबर 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या डे-नाईट कसोटीत शेवटचे शतक झळकावले होते. त्यानंतर त्याने 136 धावांची खेळी खेळली. तेव्हापासून विराट कोहलीला तिन्ही फॉरमॅटमध्ये (कसोटी, एकदिवसीय, टी-२०) शतक झळकावता आलेले नाही.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा