Cristiano Ronaldo Team Lokshahi
क्रीडा

Cristiano Ronaldo : स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नवजात मुलाचं निधन: शेअर केली पोस्ट

Published by : Siddhi Naringrekar

पुर्तगालचा स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या (Cristiano Ronaldo) याच्या नवजात मुलाचे निधन झाले आहे. याची माहिती रोनाल्डोने सोशल मिडियावरुन दिली आहे.

रोनाल्डोने शेअर केलेली पोस्ट

'आम्हाला हे सांगताना अत्यंत दु:ख होत आहे की, आमच्या नवजात मुलाचे निधन झाले आहे. हे कोणत्याही आई-वडिलांसाठी सर्वात मोठे दु:ख आहे. आमच्या मुलीचा जन्म हा आम्हाला हे दु:ख सहन करण्याची ताकद देतो. आम्ही सर्व डॉक्टरांचे आभार मानतो ज्यांनी आमची मदत केली.' प्रसूतीच्या वेळी रोनाल्डोच्या मुलाचा मृत्यू झाला आहे, तर मुलगी सुखरूप आहे. असे त्याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

ऑक्टोबरमध्ये रोनाल्डोनं जॉर्जिनासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून ते लवकरच आई- बाबा होणार असल्याची गुड न्यूज चाहत्यांना दिली होती.यासोबतच त्यांनी जुळ्या मुलांबाबत पोस्ट शेअर करून एक खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केला होता.

रोनाल्डोला 11 वर्षांचा मुलगा ख्रिस्तियानो ज्युनियर, चार वर्षांची इव्हा आणि मटाओ ही जुळी मुलं तर तीन वर्षांची अलाना मार्टिन अशी चार मुलं आहेत. त्याच्या घरात आता नवीन पाहुणा आला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray - Uddhav Thackeray : ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा विजयी मेळावा; ठाकरे बंधू काय बोलणार? साऱ्यांचं लक्ष

Latest Marathi News Update live : मनसे - शिवसेनेचा आज मुंबईत विजयी मेळावा

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या कामांना यश मिळण्याची शक्यता , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य