क्रीडा

CSK vs GT IPL 2023 Final : आयपीएलचा महामुकाबला; चेन्नईने जिंकला टॉस

आयपीएल 2023 चा अंतिम सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अहमदाबाद : आयपीएल 2023 चा अंतिम सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत आहे. रविवारी अंतिम सामना पावसामुळे रद्द झाल्याने हा सामना आज खेळवण्यात येत आहे. विजेतेपदाच्या लढतीत चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

सीएसकेने आतार्यंत 4 वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे, तर दुसरीकडे गुजरात संघ एकदाच विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात संघ सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे, तर सीएसकेने 10व्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्याचवेळी हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातला इतिहास रचण्याची संधी असेल. गुजरातचा संघ विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला तर सुरुवातीच्या दोन्ही हंगामात विजेतेपद पटकावणारा तो एकमेव संघ बनेल.

आयपीएलमध्ये चेन्नईविरुद्ध गुजरातचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. दोन्ही संघांमध्ये 4 सामने झाले आहेत. यात गुजरात संघ 4 वेळा आणि चेन्नई संघ 1 वेळा जिंकला आहे. आयपीएल 2023 च्या हंगामात, गुजरातने गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले. तर चेन्नईचा संघ दुसऱ्या क्रमांकावर होता. याच कारणामुळे या दोघांमध्ये क्वालिफायर-1 सामना होता.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Nitesh Rane On Thackeray Brothers : "यांच्यात नवरा कोण आणि नवरी कोण?" ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया

Raj Thackeray : ''त्या' बद्दल दिलगिरी व्यक्त'; विजय मेळाव्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट

Shivsena on Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर शिवसेनेचे कडवट बोल ! मोठ्या भावावर निशाणा तर लहान भावाचे कौतुक

Raj Thackeray : मराठीच्या वाकड्यात जाणाऱ्यांवर राज ठाकरे कडाडले, जाणून घ्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे