क्रीडा

डेव्हिड मिलरच्या मुलीचे कॅन्सरने निधन? काय आहे नेमके सत्य

डेव्हिड मिलरच्या सोशल मीडियावर एका मुलीचा फोटो शेअर करत भावपूर्ण श्रध्दाजंली असे लिहीले आहे

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज डेव्हिड मिलर सध्या भारतीय दौऱ्यावर असून एकदिवसीय मालिकेत दमदार कामगिरी करत आहे. परंतु, यादरम्यान एक दुःखद बातमी समोर आली आहे. डेव्हिड मिलरच्या सोशल मीडियावर एका मुलीचा फोटो शेअर करत भावपूर्ण श्रध्दाजंली असे लिहीले आहे. यानंतर सोशल मीडियावर मिलर याच्या मुलीचे कॅन्सरने निधन झाल्याचे वृत्त फिरत आहे. या वृत्तावर क्रिकेट जगतातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

डेव्हिड मिलरने एक व्हिडीओ शेअर करत आरआयपी माझी रॉकस्टार, तुझ्यावर नेहमीच प्रेम आहे, अशी पोस्ट केली आहे. या व्हिडीओमध्ये डेव्हिड तिच्यासोबत वेळ घालवताना आणि मस्ती करताना दिसत आहे. या दोघांमधील बॉन्ड व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. याशिवाय डेव्हिड मिलरने कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. यावरुन सोशल मीडियावरुन हळहळ व्यक्त करण्यात येत असून ती मुलगी डेव्हिड मिलरची मुलगी असल्याचा दावा केला जात आहे. परंतु, ही त्याची मुलगी नसून डेव्हिड मिलरची चाहती असल्याचे समोर येत आहे.

दरम्यान, भारत दौऱ्यावर आलेला डेव्हिड मिलर उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून टी-२० मालिकेनंतर वनडे मालिकेतही त्याची दमदार कामगिरी कायम आहे. भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात मिलरने भारताविरुद्ध नाबाद 106 धावांची खेळी केली. तर भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने नाबाद 75 धावांची खेळी केली आणि संघाचा मोठा डाव खेळला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Trump and Putin meeting : युक्रेनचे युद्ध संपणार? दोन्ही देशाचे राष्ट्राध्यक्ष भेटण्याच्या तयारीत

Sayaji Shinde : सुप्रसिद्ध अभिनेता सयाजी शिंदे पुन्हा रंगभूमीवर, दिसणार 'या' नाटकामध्ये

Rainforest Challenge India : गोव्यातील राष्ट्रीय स्पर्धेत सिरीलने '४बाय ४ मॉडिफाइल्ड' विभागात पटकावला दुसरा क्रमांक

Nagpur : नागपुरात उड्डाणपुलाच्या खोदकामावेळी सापडला सांगाडा