IPL Team Lokshahi
क्रीडा

राजस्थान रॉयल्सच्या ट्विटची सर्वत्र चर्चा

दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सवर 8 गडी राखून विजय मिळवून प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या आशा जिवंत ठेवल्या आहे.

Published by : Saurabh Gondhali

आयपीएलच्या( IPL) 15 व्या हंगामातला 58 सामना दिल्ली कॅपिटल्स( Delhi Capitals) आणि राजस्थान रॉयल्स( Rajasthan Royals) यांच्यात बुधवारी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला गेला. ऋषभ पंतच्या (Rishabh Pant )नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सवर 8 गडी राखून विजय मिळवून प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या आशा जिवंत ठेवल्या आहे.

दिल्लीच्या या विजयात सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दोन्ही खेळाडूंनी दुसऱ्या विकेटसाठी 144 धावांची शानदार भागीदारी करत संघाला महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिला. डेव्हिड वॉर्नरने राजस्थानविरुद्ध 52 धावांची नाबाद इनिंग खेळली, त्यादरम्यान एक विचित्र अशी घटना घडली. डेव्हिड वॉर्नरच्या खेळीदरम्यान युझवेंद्र चहलचा एक चेंडू थेट विकेटवर गेला, तरीही तो नाबाद होता. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

युजवेंद्र चहल दिल्लीच्या डावातील 9वे षटक करत होता. चहलने पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर वॉर्नरला लेगब्रेक चेंडू टाकला. वॉर्नरचा चेंडू खेळताना हुकला आणि चेंडू थेट विकेटवर गेला, पण बेल्स पडले नाहीत, त्यामुळे डेव्हिड वॉर्नरला नाबाद देण्यात आले. या घटनेनंतर गोलंदाज युजवेंद्र चहलची प्रतिक्रिया देखील पाहण्यासारखी होती, कारण तो पूर्णपणे धक्कादायक दिसत होता. या सामन्यात डेव्हिड वॉर्नरच्या नशिबाने साथ दिली. या घटनेपूर्वी युझवेंद्र चहलच्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नरचा एक झेलही सुटला होता. या सामन्यातील डेव्हिड वॉर्नरचे हे नशीब पाहून राजस्थान रॉयल्सनेही गंमतीत ट्विट केले आहे. राजस्थान रॉयल्सने डेव्हिड वॉर्नर आणि चहलचा एक फोटो शेअर केला, ज्याचे कॅप्शन लिहिले 'लिंबू मिरची कुठे आहे'.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा