Deepak Chahar Wedding Team Lokshahi
क्रीडा

Deepak Chahar Wedding : भारताचा वेगवान गोलंदाज अडकला लग्न बंधनात, पाहा फोटो

भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहर बुधवारी अडकला लग्न बंधनात

Published by : shamal ghanekar

भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहर (Deepak Chahar) बुधवारी लग्न बंधनात अडकला आहे. दीपक चहर याने त्याची प्रेयसी जया भारव्दाजसोबत (Jaya Bhardwaj) लग्नगाठ बांधली आहे. आग्रामधील जेपी पॅलेस या हॉटेलमध्ये त्यांचा लग्नसोहळा पार पडला आहे. त्यांच्या लग्नाला कुटुंबिय आणि मित्रपरिवार उपस्थित होते. दीपकने त्याच्या इंन्स्टाग्राम आकाऊंटवरून लग्नातील काही खास क्षणाचे फोटो शेअर केले आहे. या फोटोंना चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले आहे. आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

दीपक चहर आणि जया भारद्वाज यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. दीपकने त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) शेअर केले आहेत. तर त्याच्या चाहत्यांनी शुभेच्छा देत लाईक आणि छान कमेंटही शेअर केले आहेत.

दीपक चहरची पत्नी जया भारद्वाज ही दिल्लीची राहणारी आहे. जया भारद्वाज ही 'बिग बॉस'मधील स्पर्धक सिद्धार्थ भारव्दाज (Sidharth Bhardwaj) यांची बहिण आहे. तसेच तो एमटीव्ही स्प्लिट्सविला (MTV Splitsvilla 2) या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वातील विजेता देखील आहे.

दीपक चहरने स्टेडिअममध्ये केले होते प्रपोज

सात ऑक्टोबरला चेन्नई विरूद्ध पंजाब (PBKS vs CSK) असा सामना पार पडला होता. हा सामना संपल्यावर दीपकने स्टेडिअममध्ये त्याच्या प्रेयसीला प्रपोज केलं होतं दीपक चहरने गुडघ्यावर बसून जया भारद्वाज प्रपोज केले होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."