क्रीडा

Tokyo Olympic | बॉक्सींग स्पर्धेत आशीष कुमारचा पराभव

Published by : Lokshahi News

पुरुष बॉक्सींग प्रकारात आशीष कुमारचा पराभव झाला आहे. चीनचा तगडा खेळाडू बॉक्सर एरबिएक टोहेटाने आशीषचा 5-0 असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला. यामुळे आशीषचं आव्हान संपुष्टात आलं.

आशीष कुमारने यंदा पहिल्यांदाच ऑलिम्पिक खेळांमध्ये सहभाग घेतला होता. पण सलामीच्या सामन्यातच त्याला चीनचा तगडा खेळाडू बॉक्सर एरबिएक टोहेटाचा सामना करावा लागला. सामन्यात सुरुवातीपासूनच एरबिएकने आशीषवर दबाव ठेवला होता. अखेर 5-0 च्या फरकाने सामना जिंकत एरबिएकने पुढील फेरीत प्रवेश केला तर आशीषचं आव्हान संपुष्टात आलं. आशीष आधी बॉक्सर विकास कृष्णन आणि मनीष कौशिकही पराभूत झाले असून बॉक्सींगमध्ये सर्व आशा या मेरी कोमवर आहेत.

दरम्यान टोक्यो ओलिम्पिकमध्ये चौथा दिवस भारतासाठी निराशाजनकच ठरत असून आणखी दोन महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला आहे. या पराभवासोबतच भारताचे संबधित खेळाच्या प्रकारातील आव्हानही संपुष्टात आले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा