DC vs MI WPL 2023 Final  Team Lokshahi
क्रीडा

WPL Final : मुंबई इंडियन्स की दिल्ली कॅपिटल्स… कोण जिंकणार महिला प्रीमियर लीग?

महिला प्रीमियर लीगचा (WPL 2023) पहिला अंतिम सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स (MI VS DC) यांच्यात होणार आहे. आज मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर विजेतेपदाचा सामना होणार आहे.

Published by : Pankaj Prabhakar Rane

मुंबई : महिला प्रीमियर लीगचा (WPL 2023) थरार अंतिम टप्प्यात आला आहे. स्पर्धेच्या पहिल्या सीझनचा अंतिम सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स (MI VS DC WPL FINAL) यांच्यात आज होणार आहे. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. गट फेरीत दोन्ही संघांनी 6-6 सामने जिंकले होते आणि एकमेकांना एकदा पराभूत केले होते.

कधी, कुठे असेल हा अंतिम सामना?

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील अंतिम सामना रविवार 26 मार्चला मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडियमवर खेळल्या जाईल. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होईल. या अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 चॅनलवर तुम्हाला पाहता येईल.

असे असतील दोन्ही संघ

दिल्ली कॅपिटल्स

मेग लॅनिंग (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, एलिस कॅप्सी, राधा यादव, शिखा पांडे, मारिजन कॅप, टायटस साधू, लॉरा हॅरिस, तारा नॉरिस, जसिया अख्तर, मिन्नू मणी, तान्या भाटिया (विकेटकीपर), पूनम यादव , जेस जोनासेन, स्नेहा दीप्ती, अरुंधती रेड्डी, अपर्णा मंडल.

मुंबई इंडियन्स

हरमनप्रीत कौर (कर्णधार), नाट सायव्हर-ब्रंट, अमेलिया केर, पूजा वस्त्राकर, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हेदर ग्रॅहम, इसाबेल वोंग, अमनजोत कौर, धारा गुजर, सायका इशाक, हेली मॅथ्यूज, क्लो ट्रायॉन, हुमैरा काझी, कोमल जंजाड, प्रियांका बाला, सोनम यादव, नीलम बिश्त, जिंतामणी कलिता.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना धनलाभ होण्याची शक्यता, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती