क्रीडा

DC VS CSK: दिल्लीचा पहिला विजय! सामना 20 धावांनी जिंकला

दिल्लीचा या मोसमातील हा पहिला विजय आहे. तर चेन्नईचा हा पहिला पराभव आहे.

Published by : Dhanshree Shintre

Indian Premier League 2024: आयपीएलच्या 13व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने 20 धावांनी विजय मिळवत चेन्नईची विजयी घोडदौड थांबवली. या सामन्यात डेव्हिड वॉर्नर आणि ऋषभ पंत यांच्या अर्धशतकांच्या जोरावर दिल्लीने 20 षटकात 5 गडी गमावून 191 धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नईला 20 षटकांत 6 गडी गमावून केवळ 171 धावा करता आल्या. चेन्नईच्या या पराभवाने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर, तर दिल्ली कॅपिटल्स पहिल्या विजयासह सातव्या स्थानावर आहे.

दिल्लीचा या मोसमातील हा पहिला विजय आहे. तर चेन्नईचा हा पहिला पराभव आहे. या सामन्यात धोनीने 16 चेंडूचा सामना करत 37 धावांची तुफानी खेळी केली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 4 चौकार आणि 3 षटकार आले. मात्र, तो आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. दिल्लीने सीएसकेला विजयासाठी 192 धावांचे लक्ष्य दिले होते, याच्या प्रत्युत्तरात चेन्नईचा संघ 6 गडी गमावून केवळ 171 धावाच करू शकला आणि सामना गमावला.

दरम्यान, दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 20 षटकांत 5 गडी गमावून 192 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात सीएसकेला 20 षटकांत 6 गडी गमावून 171 धावा करता आल्या. दिल्लीने हा सामना 20 धावांनी जिंकला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Buldhana : मलकापूरजवळ भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, पाच जखमी

Sanjay Raut : आनंद दिघे नेते, उपनेते नाही, तर...; शिंदेंच्या जाहिरातीवरुन राऊतांची टीका

Nanded : नांदेड जिल्ह्यात पावसाचे थैमान; गोदावरी नदी धोक्याच्या पातळीजवळ

Pune : पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणातील पाच आरोपींना अटक