MS Dhoni
MS Dhoni Team Lokshahi
क्रीडा

धोनीच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी! धोनी 'या' दिवशी घेणार आयपीएलमधून निवृत्ती

Published by : Sagar Pradhan

आयपीएल 16 व्या हंगामाला येत्या 31 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या आयपीएलचे वेळापत्रक देखील शुक्रवारी जाहीर करण्यात आले आहे. या हंगामात एकूण 10 संघ सहभागी होणार आहे. हंगामातील पहिला सामना 31 मार्च रोजी गतविजेता गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. तर अंतिम सामना 28 मे रोजी खेळवला जाईल. मात्र, हा हंगाम सुरु होण्याआधी चेन्नई सुपर किंग्स आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे. धोनीच्या निवृत्तीची तारीख ठरली आहे. त्यामुळे आता धोनीच्या चाहत्यांमध्ये निराशाचे वातावरण निर्माण होणार आहे.

धोनीने 2020 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. परंतु, त्यानंतर ही तो आयपीएलमध्ये खेळतो आहे. संपूर्ण वर्षभर वाट बघत असलेले धोनीचे चाहते आयपीएलमध्ये त्याला पाहण्यासाठी उत्सूक असतात. पण आता निवृत्तीची बातमी आल्याने चाहत्यांचा हिरमोड झाला. धोनीचा आयपीएलमधील शेवटचा सामना हा 14 मे रोजी खेळणार असल्याचं म्हटलं जात आहे. माहितीनुसार, धोनीची ही शेवटची आयपीएल असणार आहे. तर धोनी आपल्या आयपीएल कारकीर्दीतील शेवटचा सामना हा 14 मे ला खेळणार आहे. अशी माहिती समोर आली आहे.

धोनीची आयपीएल कारकीर्द

धोनीने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 234 सामने खेळला आहे. यामध्ये त्याने 4 हजार 978 धावा केल्या आहेत. यात 24 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच धोनीने 229 गगनचुंबी सिक्स ठोकले आहेत.

Daily Horoscope 07 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचं नशीब सोन्यासारखं चमकणार; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 07 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

ICSE 2024 Results: आयसीएसई बोर्डाचा १०वी, १२वीचा निकाल जाहीर; यंदा मुलींनी मारली बाजी!

Rohit Pawar: रोहित पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल; सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाले...

Rice Water: चमकदार त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचे फायदे जाणून घ्या...