क्रीडा

Duleep Trophy 2024: दुलीप ट्रॉफी मालिकेतून भारतीय क्रिकेट संघातील "हे" दोन खेळाडू होणार बाहेर! 'हे' आहे कारण...

दुलीप ट्रॉफी मालिकेला सुरुवात होण्याआधीच भारतीय क्रिकेट संघा मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. भारतीय क्रिकेट संघासंबंधतीत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

Published by : Team Lokshahi

दुलीप ट्रॉफी सामन्याला 5 सप्टेंबरपासून बेंगळुरू, अनंतपूर, आंध्र प्रदेश, एम चिन्नास्वामी स्टेडियम येथे सुरुवात होणार आहे अवघ्या काही दिवसांनंतर दुलीप ट्रॉफी 2024 चा थरार रंगणार आहे. बांगलादेश मालिकेपूर्वीच एक वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज जखमी झाला आहे. मात्र दुलीप ट्रॉफी मालिकेला सुरुवात होण्याआधीच भारतीय क्रिकेट संघा मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. भारतीय क्रिकेट संघासंबंधतीत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

बीसीसीआयकडून संघांमध्ये बदल करण्यात आले आहेत आणि त्यादरम्यान भारतीय क्रिकेट संघासंबंधतीत अशी माहिती मिळाली आहे की, टीम बीमध्ये असलेले खेळाडू स्पिन ऑलराउंडर रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज हे दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या फेरीत सहभागी होणार नाहीत. त्याचसोबत टीम-बीमध्ये मोहम्मद सिराजची जागा नवदीप सैनी घेणार असल्याच बोर्डानुसार समोर आलं आहे आणि टीम-सीमध्ये उमरान मलिकची जागा गौरव यादव घेणार असं देखील सांगण्यात आलं आहे.

टीम बीमध्ये (कर्णधार) अभिमन्यू इसवरन, यशस्वी जैस्वाल, सरफराज खान, ( विकेटकीपर) ऋषभ पंत, मुशीर खान, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, यश दयाल, मुकेश कुमार, राहुल चहर, आर साई किशोर, मोहित अवस्थी , ( विकेटकीपर) एन जगदीसन यांचा समावेश आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Meenatai Thackeray Statue : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Latest Marathi News Update live : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींनी घाईघाईने निर्णय घेऊ नका, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Kiran Kale Shivsena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेच्या किरण काळेंवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?