क्रीडा

England Test Series | ऋषभ पंतला डेल्टा व्हॅरिएंटचा संसर्ग

Published by : Lokshahi News

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर इंग्लंड विरुद्धचे कसोटी सामने सुरु होण्यास बराच वेळ असल्याने भारतीय क्रिकेटपटू इंग्लंडमध्ये सुट्टी एन्जॉय करत होते. याचवेळी संघातील एका महत्त्वाच्या खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली आहे.

इंग्लंडच्या संघात मागील आठवड्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून भारतीय संघाची कोरोना टेस्ट करण्यात आली यावेळी भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (England Test Series) पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार ऋषभ लंडनमध्येच त्याच्या एका नातेवाईकाच्या घरी विलगीकरणात आहे.

त्यामुळे गुरुवारी डरहमला जाणाऱ्या भारतीय संघासोबत तो जाणार नाही. सुदैवाने संघातील इतर खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली नसल्याचंही समोर येत आहे. भारतीय संघ 4 ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मनसे - शिवसेनेचा आज मुंबईत विजयी मेळावा

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या कामांना यश मिळण्याची शक्यता , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?