क्रीडा

पाकिस्तानचा पराभव करत इंग्लंड ठरला यंदा टी-20 विश्वचषक विश्वविजेता

Published by : Sagar Pradhan

टी-20 विश्वचषक 2022 चा अंतिम सामना आज इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात पार पडला. आज या संपूर्ण सामन्याकडे जगाचे लक्ष लागून होते. आज झालेल्या इंग्लंड आणि पाकिस्तान सामन्यात इंग्लंडने शेवटपर्यंत झुंज देत पाकिस्तानवर विजय मिळवत वर्ल्डकप आपल्या नावावर केला आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला गेलेला हा टी20 विश्वचषक स्पर्धेतील फायनलचा सामना एक लो स्कोरिंग असूनही चुरशीची झाल्याची पाहायला मिळाली. 

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतलेल्या इंग्लंडने आपला निर्णय योग्य असल्याचं दाखवत अवघ्या 137 धावांमध्ये पाकिस्तानला रोखले. पण पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीमुळे 138 धावाचं आव्हान गाठताना इंग्लंडला अवघड झालं. पण त्याचवेळी त्यांचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सने एकहाती झुंज देत नाबाद 52 धावा करत 5 गडी राखून इंग्लंडला विजय मिळवून दिला. 

इंग्लंडने दुसऱ्यांदा टी 20 वर्ल्ड कप जिंकला आहे. याच मेलबर्नच्या मैदानात 1992 साली पाकिस्तानने इंग्लंडला हरवून वर्ल्ड कप जिंकला होता. आज त्याच पराभवाची इंग्लंडने परतफेड केली. इंग्लंडच्या विजयात बेन स्टोक्सने महत्त्वाची भूमिका बजावली. तो शेवटपर्यंत विकेटवर उभा राहिला. त्याने 49 चेंडूत नाबाद 52 धावा केल्या. यात पाच चौकार आणि एक षटकार होता. इंग्लंडने पाच विकेटने वर्ल्ड कप जिंकला.

अजित पवार यांच्याकडून रोहित पवार यांची रडण्याची नक्कल; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Amol Kolhe : कांदा निर्यात बंदी जी उठवली ही फसवी निर्यात बंदी उठवली आहे

सुषमा अंधारे यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाल्या...

"भाजप सरकारच्या नादानपणामुळे भारतीय सैनिकांवर हल्ला झाला"; 'मशाल' पेटवून उद्धव ठाकरेंचं PM मोदींवर शरसंधान

IPL 2024 : धरमशाला मैदानात चेन्नई बनला सुपर 'किंग'! पंजाबचा केला दारुण पराभव