लीड्स कसोटी गमावल्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथी कसोटी आजपासून सुरू होत आहे.या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही संघांनी आपल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल केले आहेत. भारताने इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांच्याबदली उमेश यादव आणि शार्दुल ठाकूर यांना संधी दिली आहे. दुसरीकडे इंग्लंडने सॅम करनऐवजी वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सला संघात घेतले आहे. तर पितृत्वाच्या रजेमुळे या कसोटीत न खेळणाऱ्या जोस बटलरऐवजी ओली पोप संघात आला आहे.
पाच सामन्यांची मालिका सध्या १-१ने बरोबरीत आहे. अशा परिस्थितीत हा सामना जिंकणारा संघ मालिकेत आघाडी घेईल. केनिंग्टनच्या ओव्हल मैदानावर हा सामना रंगणार आहे.
प्लेईंग इलेव्हन
भारत : रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
इंग्लंड : रोरी बर्न्स, हसीब हमीद, डेव्हिड मलान, जो रूट (कर्णधार), ओली पोप, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), मोईन अली, ख्रिस वोक्स, क्रेग ओव्हर्टन, ओली रॉबिन्सन, जेम्स अँडरसन.