क्रीडा

T20 WC: अफगाणिस्तान न्यूझीलंड सामन्याकडे भारतीय क्रीडाप्रेमींच्या नजरा

Published by : Lokshahi News

टी २० वर्ल्डकपमध्ये आज अफगाणिस्तान न्यूझीलंडमध्ये सामना होणार आहे. या सामन्याची नाळ भारतीय टीमशी जूळला आहे. कारण आजची मॅच भारताची नसली तरी सर्व भारतीय क्रिडाप्रेमी हा सामना पाहणार आहेत. अफगाणिस्तान जिंकल्यास भारताला फायदा होणार आहे.

भारतीय संघाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याचा आशा अद्यापही कायम आहेत. पाकिस्तानने उपांत्य फेरीमध्ये प्रवेश निश्चित केला असला तरी उपांत्यफेरीत जाणारा दुसरा संघ कोण ही चुरस कायम आहे. दुसऱ्या स्थानासाठी भारताबरोबरच अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडचा संघ दावेदार आहे. त्यामुळेच प्रत्येक सामन्यामध्ये सर्वोत्तम कामगिरी करुन उरलेल्या त्या एका स्थानी आपल्या संघाचं नाव असावं म्हणून तिन्ही संघ जीव ओतून खेळताना दिसत आहेत.

न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान सामन्यावर आता भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे या सामन्यावर भारतीय क्रीडाप्रेमींच्या नजरा लागून आहेत. सोशल मीडियावर भारतीय चाहते अफगाणिस्तानच्या बाजून उभे ठाकले आहेत. तसेच एकापेक्षा एक सरस असे मीम्स शेअर करत आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा