virat kohli Team Lokshahi
क्रीडा

IPL 2022: विराटच्या चाहत्याने असं काय केलं की तो गेला गजाआड

क्रीकेटविश्वात फॅन्स अनेकदा हद्द ओलांडून आपल्या आवडत्या खेळाडूवर असलेलं प्रेम व्यक्त करत असतात

Published by : Vikrant Shinde

क्रीकेटविश्वात फॅन्स अनेकदा हद्द ओलांडून आपल्या आवडत्या खेळाडूवर असलेलं प्रेम व्यक्त करत असतात. अशीच एक घटना काल मुंबई विरूद्ध बंगळुरू ह्या IPL सामन्यादरम्यान घडली आहे.

काल (09-04-2022) मुंबई इंडियन्स विरूद्ध बंगळुरू असा सामना रंगला. ह्या सामन्यात बंगळुरू विजयी झाली मात्र, ह्या शिवाय एका गोष्टीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आणि ती म्हणजे सामना सुरू असतानाच 26 वर्षाचा दशरथ जाधव मैदानात शिरला व तो धावत विराट कोहलीकडे गेला. विराटला हस्तांदोलन केल्यानंतर त्याने आपला मोर्चा रोहीतकडे वळवला मात्र, तो रोहीत पर्यंत पोहोचण्याआधीच सुरक्षारक्षक व पोलिसांनी त्याला पकडले.

दरम्यान, त्याला मैदानाबाहेर नेत असतानाही त्याने पोलिसांशी व सुरक्षारक्षकांशी हुज्जत घातली. त्यामुळे आता त्याला जेलची हवा खावी लागणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा