क्रीडा

FIFA World Cup 2022 मध्ये आज 3 सामने खेळले जाणार; जाणून घ्या कुठे पाहाल

Published by : Siddhi Naringrekar

फिफा विश्वचषक 2022 मध्ये आज सोमवारी 3 सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना इंग्लंड आणि इराण यांच्यात होणार आहे. फिफा विश्वचषकाच्या दुसऱ्या सामन्यात आफ्रिकन चषक चॅम्पियन सेनेगल आणि नेदरलँड्सचा संघ आमनेसामने येणार आहे. रात्री उशिरा अमेरिका आणि वेल्स यांच्यात तिसरा सामना रंगणार आहे. दिवसाच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडचा वरचष्मा आहे, परंतु इराणकडे प्रशिक्षक म्हणून कार्लोस क्विरोझ आहे, ज्यांनी संघाला येथे आणले आहे. सर्वांच्या नजरा इंग्लंडच्या हॅरी केनवर असतील. वेल्स संघ 1958 नंतर प्रथमच या स्पर्धेत उतरणार असून त्यांच्यासमोर अमेरिकेचे तगडे आव्हान असेल. अमेरिकेचा नवा कर्णधार 23 वर्षीय टायलर अॅडम्स असेल. इक्वेडोरने या विश्वचषकातील सलामीचा सामना जिंकला. इक्वेडोरने यजमान कतारचा 2-0 असा पराभव केला.

फिफा विश्वचषक स्पर्धेत सोमवारी ३ सामने खेळवले जाणार आहेत. दिवसाचा पहिला सामना इंग्लंड आणि इराण यांच्यात, दुसरा सामना सेनेगल आणि नेदरलँड्स आणि तिसरा सामना अमेरिका आणि वेल्स यांच्यात रात्री उशिरा होणार आहे. इंग्लंड आणि इराण यांच्यात फिफा विश्वचषकाचा दुसरा सामना 21 नोव्हेंबर (सोमवार) रोजी होणार आहे. स्पर्धेतील तिसरा आणि चौथा सामना एकाच दिवशी होणार आहे.

इंग्लंड आणि इराण यांच्यातील फिफा विश्वचषकाचा दुसरा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसहा वाजता सुरू होईल. सेनेगल आणि नेदरलँड्सचे संघ रात्री 9.30 वाजता मैदानात उतरतील, तर अमेरिका आणि वेल्स यांच्यात दुपारी 12.30 वाजता सामना होणार आहे. फिफा विश्वचषकात सोमवारी खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांचे थेट प्रक्षेपण Sports18 आणि Sports18 HD वर होईल.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...