क्रीडा

Rohit Sharma Retirement: विराट पाठोपाठ रोहित शर्माची देखील T-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारताीय क्रिकेट संघाने शनिवारी बार्बाडोस येथे झालेल्या T-20 विश्वचषक फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेवर सात धावांनी रोमहर्षक विजय मिळवून टीम इंडिया तब्बल 17 वर्षानंतर विश्वविजेता ठरली.

Published by : Dhanshree Shintre

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारताीय क्रिकेट संघाने शनिवारी बार्बाडोस येथे झालेल्या T-20 विश्वचषक फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेवर सात धावांनी रोमहर्षक विजय मिळवून टीम इंडिया तब्बल 17 वर्षानंतर विश्वविजेता ठरली. यादरम्यान भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने T-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती झाहीर केली. क्रिकेट प्रेमी विराटच्या निवृत्तीबाबत सावरेपर्यंत चाहत्यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. कारण T-20 विश्वचषक जिंकून दिलेल्या भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने देखील T-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती झाहीर केली आहे.

विराट कोहलीच्या पाठोपाठ टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानेही T-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. निवृत्तीची घोषणा करताना तो म्हणाला की, निरोप घेण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ नाही. भारताला आयसीसी विश्वचषक जिंकून देणारा तिसरा कर्णधार म्हणून रोहित शर्मा कपिल देव आणि एमएस धोनी यांच्या विशेष कंपनीत सामील झाला. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप आणि एकदिवसीय विश्वचषकात भारताच्या पराभवानंतर शर्माचा एका वर्षाखालील तिसरा विश्वचषक सामना होता.

भारतीय क्रिकेट संघासाठी रोहित शर्माचे योगदान मोलाचे आहे. कपिल देव आणि धोनी नंतर टीम इंडियाला आयसीसी ट्रॉफी जिंकवून देणारा रोहित शर्मा तिसरा कर्णधार ठरला. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघ टी20 विश्वचषक 2024 मध्ये अपराजित राहिला. भारतीय संघाने यंदाच्या टी20 विश्वचषकातील सर्व सामने जिंकले आहेत. रोहित शर्माची कामगिरी या उल्लेखनीय होती. त्याने 8 सामन्यात 156.71 च्या स्टाइक रेटने 257 धावा केल्या. ज्यामध्ये 24 चाैकार आणि 15 षटकार ठोकल्या. रोहित शर्माची कर्णधारपदाची शैली भारतीय चाहते कधीच विसरु शकणार नाहीत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा