क्रीडा

भारतीय क्रिकेट विश्वावर शोककळा! भारताच्या 'या' माजी क्रिकेटपटूचा बाल्कनीतून पडून मृत्यू

टीम इंडियाच्या एका माजी खेळाडूचे आपल्या राहत्या घराच्या बाल्कनीमधून पडून निधन झाले.

Published by : Dhanshree Shintre

T-20 वर्ल्ड कपमधील टीम इंडिया आणि अफगाणिस्तानमधील मॅच सुरू व्हायला काही तास बाकी आहेत. संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष या मॅचकडे असताना क्रिकेट वर्तुळातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या एका माजी खेळाडूचे आपल्या राहत्या घराच्या बाल्कनीमधून पडून निधन झाले. या माजी भारतीय खेळाडूने वयाच्या 52 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. या खेळाडूच्या मृत्यूनंतर दिग्गज खेळाडू अनिल कुंबळे आणि बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी शोक व्यक्त केला आहे.

डेव्हिड जॉन्सन असं या माजी खेळाडूचं नाव असून चौथ्या मजल्यावरून पडून निधन झाले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ज्यामुळे आता पोलिसांना आत्महत्या केल्याचा संशय असल्याचे बोलले जात आहे. डेव्हिड जॉन्सन यांना तीन दिवसांपूर्वीच दवाखान्यामधून डिस्चार्ज देण्यात आला होता. जॉन्सन हे डिप्रेशनचे शिकार ठरल्याची माहिती समजत आहे. जॉन्सन हे वेगवान गोलंदाज होते, टीम इंडिया आणि कर्नाटक संघासाठी त्यांनी देशांतर्गत क्रिकेट खेळलं आहे.

डेव्हिड जॉन्सन यांची कारकीर्द

डेव्हिड जॉन्सन यांनी टीम इंडियाकडून 1996 साली पदार्पण केलं होतं. टीम इंडियाकडून त्यांनी दोन सामने खेळले होते, यामध्ये त्यांनी एकूण तीन विकेट घेतल्या. टीम इंडियाकडून त्यांना फारशी संधी मिळाली नाही. मात्र कर्नाटक संघाकडून त्यांनी दीर्घकाळ रणजी क्रिकेट खेळले आहे. 39 प्रथम श्रेणी आणि 33 लिस्ट ए सामने खेळले आहेत. 1992 मध्ये त्यांनी देशांतर्गत क्रिकेट खेळायला सुरूवात केली होती. दहा वर्षे त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळलीत. 2002 पर्यंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये ते सक्रीय होते.

दिग्गजांकडून श्रद्धांजली

डेव्हिड जॉन्सन यांच्या निधनाची बातमी येताच सोशल मीडियावर आजी-माजी खेळाडू त्यांनी श्रद्धांजली देत आहेत. टीम इंडियाचा माजी दिग्गज खेळाडू अनिल कुंबळे यानेही जॉन्सनला श्रद्धांजली वाहिली. माझा क्रिकेट पार्टनर डेव्हिड जॉन्सन यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. त्यांच्या कुटुंबीयांप्रती हार्दिक संवेदना, अशा पोस्ट अनिल कुंबळेने केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षणानंतर भाजपचा जल्लोष

Sanjay Raut On BJP : “मनोज जरांगेंची कुचेष्टा का केली जाते?” संजय राऊतांचा भाजप नेत्यांवर सवाल

Maharashtra Weather Update : मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाचा यलो अलर्ट

Pune Ganpati Visarjan News : पुण्यात गणपती विसर्जनाच्यावेळी दुर्दैवी घटना; एका युवकाचा मृत्यू