क्रीडा

हैदराबादमध्ये रंगणार Formula 4 Indian Championship

Published by : Lokshahi News

क्रिकेटचा मोठा चाहता वर्ग असणारा भारत देश खेळाप्रती आपली आवडबदलताना आपलाल्या देशात आहे. टोकियो ऑलम्पिकमध्ये त्याची प्रचीती आली. आता अजून एका खेळासाठी भारत तयार झाला आहे. तो खेळ आहे फॉर्म्युला 4 इंडियन चॅम्पियनशिप. ही स्पर्धा यावर्षी हैदराबाद येथे आयोजित करण्यात आली आहे.

तेलंगणाचे आयटी उद्योग मंत्री आणि महापालिका प्रशासन, उद्योग आणि वाणिज्य मंत्री कलवकुंतला तारका रामा राव (Kalvakuntla Taraka Rama Rao) आणि दक्षिण भारतीय अभिनेता विशाल (Actor Vishal) यांच्यासह रविवारी हैदराबादच्या माधापूर येथे 'फॉर्म्युला रिजनल इंडियन चॅम्पियनशिप आणि फॉर्म्युला 4 इंडियन चॅम्पियनशिप' चे उद्घाटन होत आहे. हैदराबाद येथे होणारी जागतिक दर्जाची एफआयए ग्रेड स्ट्रीट सर्किट फेब्रुवारी 2022 मध्ये चार शहरांमध्ये होणार आहे.

हैदराबाद शहर पोलीस आयुक्त अंजनी कुमार यांनी F3 स्ट्रीट सर्किट शर्यतीला हिरवा झेंडा दाखवला. ही स्पर्धा शहरातील आयकॉनिक केबल पुलापासून सुरू करण्यात आली आणि कार्यक्रमस्थळी संपली. रेसिंग प्रमोशनच्या सध्याच्या प्रयत्नांविषयी बोलताना रेसिंग प्रमोशनचे अध्यक्ष अखिलेश रेड्डी म्हणाले की, "मोनॅको एक सार्वभौम शहर-राज्य असल्याने तिथे एफ 1 ड्रायव्हर्स तयार झाले आहेत आणि आपल्याकडे एक अब्जाहून अधिक लोकसंख्या असलेल्या देशात अनेक इच्छुक रेसिंग ड्रायव्हर्सना संधी देण्यासाठी हे व्यासपीठ आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadanvis Podcast : 'एक नवी सुरुवात करतोय...'; मुख्यमंत्री पॉडकास्टच्या माध्यमातून साधणार संवाद, पंढरपुरातून केली घोषणा

Mumbai Mega Block : मुंबईकरांनो! आज लोकलचं वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडा; तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

Wadala Vitthal Mandir : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विठुरायाच्या चरणी नतमस्तक; प्रति पंढरपुरात पांडुरंगाची केली महापूजा

Latest Marathi News Update live : कोकण किनारपट्टीला आज ऑरेंज अलर्ट, ग्रामीण भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता