क्रीडा

ग्लेन मॅक्सवेल अडकला लग्नबेडीत; या भारतीय मुलीसोबत थाटला संसार

Published by : Vikrant Shinde

ऑस्ट्रेलियन फलंदाज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा प्रमुख खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याचा नुकताच विवाहसोहळा पार पडलाय. या विवाहसोहळ्याचे भारतीय कनेक्शन समोर आले आहे. कारण मॅक्सवेलने भारतीय मुलीसोबत आपला संसार थाटला आहे. नेमकी ही तरूणी कोण आहे ते जाणून घेऊयात.

ऑस्ट्रेलियाचा स्टार क्रिकेटर ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) त्याची भारतीय वंशाची गर्लफ्रेंड विनी रमणसोबत (Vini Raman) लग्न केले आहे. १८ मार्च रोजी दोघांचे लग्न झाले.मॅक्सवेल आणि विनी दोघेही बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. दोन वर्षांपूर्वी १४ मार्च २०२० रोजी दोघांचा साखरपुडा (एंगेजमेंट) झाला होता, पण कोरोनामुळे त्यांना त्यांचे लग्न लांबणीवर पडले होते. अखेर दोन वर्षांनी त्यांच्या लग्नाला मुर्हूत सापडला आणि १८ मार्च २०२२ या दिवशी दोघांची लग्नगाठ बांधली गेली. विनी रमनच्या इन्स्टाग्राम पोस्टवरून या लग्नाचा खुलासा झाला आहे.

विनी रमनने शेअर केला फोटो

ग्लेन मॅक्सवेलसोबतच्या लग्नाची माहिती स्वत: विनीने त्याच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे दिली आहे. मॅक्सवेलसोबत लग्नानंतरचा पहिला फोटो शेअर करताना तिने लिहिले आहे की, 'मिस्टर अँड मिसेस मॅक्सवेल.' तर आरसीबीने देखील आपला स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेल आणि विनी या नव दांपत्याला त्यांच्या आयुष्यातील नव्या इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे, पण लग्नासाठी त्या दौऱ्यातून मॅक्सवेलने नाव मागे घेतले आहे. आयपीएलच्या पहिल्या आठवड्यातही तो खेळताना दिसणार नाही, अशा चर्चा सुरू आहे. आरसीबीचा आयपीएल २०२२ मधील पहिला सामना २७ मार्च रोजी पंजाब किंग्ज विरुद्ध आहे. मागील वर्षी मॅक्सवेल हा पंजाबच्याच संघात होता. आणि आता तो आरसीबीच्या संघाकडून खेळणार आहे. त्यामुळे पंजाबविरुद्धच्या सामन्यात त्याच्याकडून कशी कामगिरी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. मॅक्सवेल अखेर विवाहबंधनात अडकला आहे. त्यामुळे आता बायको विनी मॅक्सवेलसाठी लकी ठरते का, याची उत्सुकता चाहत्यांमध्ये असेल.

"पहिल्या चार टप्प्यातच आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा सुफडा साफ केला "; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा दावा

मोठी बातमी! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक

World Hypertension Day 2024 : 'जागतिक उच्च रक्तदाब दिवस' कधी आणि का साजरा केला जातो?

"४ तारखेनंतर टरबूजचा भाव उतरणार आहे"; उद्धव ठाकरेंची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका

Daily Horoscope 17 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना साडेसातीचाही होणार त्रास; पाहा तुमचे भविष्य