Glenn Phillips Catch Video Viral 
क्रीडा

न्यूझीलंडचा खेळाडू बनला 'सुपरमॅन'! हवेत उडी मारून घेतला जबरदस्त झेल, व्हिडीओ पाहून थक्कच व्हाल

फिलिप्सने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नश लाबुशेनचा जबरदस्त झेल पकडून त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

Published by : Team Lokshahi

न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सने हवेत उडी मारून अप्रतिम झेल घेतला आहे. फिलिप्सने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नश लाबुशेनचा जबरदस्त झेल पकडून त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. ग्लेन फिलिप्सच्या या शानदार झेलचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

टीम साऊदीच्या गुड लेंथ चेंडूवर लाबुशेनने प्वाईंटच्या दिशेनं फटका मारला, पण मैदानात असलेल्या फिलिप्सने हवेत उडी मारली अन् लाबुशेनचा झेल पकडला. फिलिप्सने मैदानात अप्रतिम क्षेत्ररक्षण करून फिलिप्सने झेल पकडला आणि मैदानात क्रिकेटप्रेमींनी फिलिप्सवर स्तुतीसुमने उधळली. फिलिप्सचा हा व्हिडीओ ट्वीटरवर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी त्याच्या क्षेत्ररक्षणाचं कौतुक केलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा