भारताचा ग्रँडमास्टर डी. गुकेश याने सिंगापूरमधील 14व्या आणि अंतिम सामन्यात 18 व्या वर्षी सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनून इतिहास रचला आहे. गुकेशने लिरेनच्या 6.5 च्या तुलनेत 7.5 गुण मिळवले, तर 14-खेळांच्या सामन्यातील शेवटचा क्लासिक गेम जिंकल्यानंतर, जो बहुतेक स्पर्धा ड्रॉच्या उंबरठ्यावर होता. मात्र गुकेशच्या यापूर्वी, रशियाच्या दिग्गज गॅरी कास्पारोव्हने सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन म्हणून विक्रम केला होता.
या लढतीत १४व्या डावामध्ये डिंग लिरेनकडे पांढरी मोहरी असूनही, गुकेश अधिक आक्रमकपणे आणि आत्मविश्वासाने खेळत होता. लढतीपूर्वी आणि दरम्यान डिंग लिरेन जगज्जेता होता. तुलनेने नवखा असूनही गुकेशनेच बहुतेकदा विजयासाठी प्रयत्न केले. या लढतीतील पहिला डाव गमावूनही गुकेश विचलित झाला नाही. बुद्धिबळ इतिहासातील सर्वांत युवा जगज्जेता बनण्याचा मान पटकावला. महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदनंतरचा गुकेश हा दुसराच भारतीय जगज्जेता ठरला. विश्वनाथन आनंदनंतर बुद्धिबळ जगतात त्या प्रकारे वर्चस्व गाजवू शकेल असा कुणी भारतीय निर्माण होईल का, असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो.
गुकेश महेंद्र सिंग धोनीला मानतो आपला आदर्श
गुकेशने आपल्या विजयाची गोष्ट सांगताना, भारतीय क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीला आपला आदर्श मानल्याचे म्हटले होते. विशेष म्हणजे, गुकेशच्या विजयात एक खास कनेक्शन समोर आलं आहे. त्याच्या मेंटल कोच पॅडी उपटन यांचा धोनीच्या नेतृत्वाखाली भारताच्या 2011 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर महत्त्वाचा सहभाग होता. पॅडी उपटन हे भारताच्या क्रिकेट संघाला आणि हॉकी संघाला मोठ्या स्पर्धांमध्ये यश मिळवून देण्याच्या बाबतीत प्रमुख योगदान देणारे प्रशिक्षक आहेत.
मुलाच्या भविष्यासाठी आपलं करिअर पणाला लावलं
डी गुकेशचं पूर्ण नाव गुकेश दोम्मराजू आहे. गुकेशचा जन्म 29 मे 2006 मध्ये चेन्नईत झाला. त्याच्या वडिलांचं नाव रजनीकांत आहे आणि ते कान, नाक आणि घश्याचे सर्जन आहेत. तर त्याची आई पद्मा या सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आहेत. गुकेशने वयाच्या सातव्या वर्षापासून बुद्धिबळ खेळण्यास सुरूवात केली. बुद्धिबळसाठी शाळा सोडणाऱ्या गुकेशसाठी विश्वेविजेतेपद जिंकणे हा महत्त्वाचा क्षण होता. आपल्या लेकाने केलेल्या कामिगिरीमुळे हा क्षण त्याच्या वडिलांसाठी आभाळ ठेगणं करणारा ठरला आहे. एकेकाळी गुकेशच्या वडिलांनी मुलाच्या भविष्यासाठी आपलं करिअर पणाला लावलं होतं.