भारताचा सर्वोत्तम क्रिकेटपटू हरभजन सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. हरभजनने टि्वट करुन निवृत्तीची घोषणा केली आहे.
"सर्व चांगल्या गोष्टींना शेवट असतो. खेळाने मला आयुष्यात सर्व काही दिले. माझा क्रिकेटमधला 23 वर्षांचा प्रवास सुंदर आणि संस्मरणीय करणार्या सर्वांचे मी आभार मानतो" असे टि्वट करत हरभजनने निवृत्ती जाहीर केली आहे.