Hardik Pandya And Natasa Stankovic Google
क्रीडा

Hardik-Natasa Divorce: हार्दिक पंड्या-नताशा स्टॅनकोविकचा घटस्फोट, इन्स्टाग्रामवर शेअर केली पोस्ट

चार वर्ष एकत्रित संसार केल्यानंतर दोघांच्या सहमतीने घटस्फोट घेत असल्याचं हार्दिक पंड्यानं जाहीर केलं आहे.

Published by : Naresh Shende

Hardik Pandya And Natasa Stankovic Divorce : गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचा स्टार खेळाडू हार्दिक पंड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्यात सर्वकाही आलबेल नव्हतं. दोघांच्या नात्यात दुरावा झाल्याचं बोललं जात होतं. या चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे. कारण हार्दिकने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत पत्नी नताशासोबत घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं आहे. चार वर्ष एकत्रित संसार केल्यानंतर दोघांच्या सहमतीने घटस्फोट घेत असल्याचं हार्दिकने जाहीर केलं आहे.

हार्दिक पंड्याने पोस्ट शेअर करत म्हटलं की, दोघांच्या सहमतीनं आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. एकत्र राहण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केला. पण आमच्या दोघांसाठी योग्य निर्णय असल्याचं आम्हाला समजलं. आम्ही दोघांनी एकत्रितपणे संसार केल्यानंतर, आनंदाचे क्षण घालवल्यानंतर तसच एक कुटुंब म्हणून हा निर्णय घेणे आमच्यासठी खूप अवघड होतं. आम्ही आमचा मुलगा अगस्त्यला खूप प्रेम देत राहू. त्याच्या आनंदासाठी सर्वकाही करण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला विनंती आहे, आमच्या कठीण काळात तुम्ही सहकार्य करावं आणि आमचं खासगी आयुष्य समजून घ्यावं.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा