क्रीडा

IPL 2022: यो-यो हार्दीक पंड्या; फिटनेस टेस्ट पास झाल्यामुळे आयपीएलचा मार्ग मोकळा

Published by : left

गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) कॅप्टन हार्दिक पंड्याने (Hardik pandya) यो-यो टेस्ट (Yo-Yo Test) पास झाला आहे. त्यामुळे हार्दिकचा (Hardik pandya) आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेत खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि हार्दीक पंड्याच्या (Hardik pandya) चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे.

हार्दिक पंड्याच्या (Hardik pandya) फिटनेसबद्दल सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात होते. तो खेळण्यासाठी फिट आहे का? या बद्दल विविध शंका-कुशंका व्यक्त केल्या जात होत्या. अखेर आज या सर्व प्रश्नांची उत्तर मिळाली आहेत. गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) कॅप्टन हार्दिक पंड्याने (Hardik pandya) फिटनेस टेस्ट पास केली आहे. ऑलराऊंडर हार्दिक पंड्याने (Hardik pandya) कठीण समजली जाणारी यो-यो टेस्ट पास केली आहे. बंगळुरु स्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) हार्दिकची (Hardik pandya) ही चाचणी झाली. फिटनेस टेस्ट पास झाल्यामुळे हार्दिकचा आयपीएल 2022 स्पर्धेत खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

यो-यो टेस्टमध्ये हार्दिकचा (Hardik pandya) सरासरी स्कोर 18 आणि त्यापेक्षा जास्त राहिला आहे. मागच्यावर्षी श्रेयस अय्यरला सुद्धा आयपीएलच्या दुसऱ्या सत्रात खेळण्याआधी फिटनेस टेस्ट द्यावी लागली होती. यावर्षी ऑक्टोंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणारी टी-20 वर्ल्डकप स्पर्धा डोळ्यासमोर ठेऊन बीसीसीआय हे सर्व करत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा