Hardik Pandya Twitter
क्रीडा

हार्दिक पंड्याचं बडोद्यात जंगी स्वागत! टी-२० वर्ल्डकपच्या चॅम्पियन खेळाडूसाठी चाहत्यांचा जनसागर उसळला, पाहा VIDEO

टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूंचं त्यांच्या होमटाऊनमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं. हार्दिकच्या स्वागताचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Published by : Naresh Shende

Hardik Pandya Grand Welcome In Vadodara: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूंचं त्यांच्या होमटाऊनमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं. भारतीय क्रिकेट संघाचा उप कर्णधार हार्दिक पंड्याचंही वडोदऱ्यात जंगी स्वागत करण्यात आलं आहे. हार्दिकने १५ जुलैला बडोद्यात येणार असल्याचं जाहीर केलं होतं. तेव्हापासून पंड्याच्या स्वागतासाठी चाहत्यांनी जोरदार तयारी केली होती. हार्दिकने टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर १६ व्या दिवशी घरवापसी केली आहे. याचदरम्यान हार्दिकने रोड शो सुद्धा केला आहे. यावेळी हार्दिकचे चाहते मोठ्या संख्येत उपस्थित होते. चाहत्यांना पाहून हार्दिकलाही खूप आनंद झाला असल्याचं व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे.

वडोदऱ्यात हार्दिकचं जोरदार स्वागत

टीम इंडियाने टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मुंबईत ४ जुलैला विजयी मिरवणूक काढली होती. याचदरम्यान सर्व खेळाडू बसमधून चाहत्यांशी संवाद साधत असल्याचं पाहायला मिळालं होतं. हार्दिकनेही वडोदऱ्यात अशाप्रकारे चाहत्यांशी संवाद साधला. हार्दिक ओपन बसमधून प्रवास करत असताना हातात तिरंगा फडकवत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. हार्दिक पंड्या प्राईड ऑफ वडोदरा अशा आशयाचा बॅनरही या बसला लावल्याचं पाहायला मिळत आहे.

हार्दिकची टी- २० वर्ल्डकपमध्ये चमकदार कामगिरी

यूएसए आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टूर्नामेंटआधी हार्दिक पंड्याच्या फॉर्मबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. कारण मुंबई इंडियन्ससाठी हार्दिक अप्रतिम कामगिरी करण्यात अपयशी ठरला. परंतु, यंदाच्या टी-२० वर्ल्डकपमध्ये हार्दिकने जबदरस्त कामगिरी करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्याने टूर्नामेंटमध्ये १४४ धावा करून ११ विकेट घेण्याची उल्लेखनीय कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेविरोधात झालेल्या फायनलमध्ये हार्दिक पंड्याने योग्य वेळी डेव्हिड मिलरला बाद केल्यानं भारताचा विजय निश्चित झाला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा