Hardik Pandya 
क्रीडा

IND vs BAN T20 WC 2024: बांगलादेशचा धुव्वा उडवल्यानंतर हार्दिक पंड्यानं दिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाला; "काही परिस्थितीमध्ये सर्वांना..."

भारतानं बांगलादेशला १९७ धावांचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर या धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेशने २० षटकात ८ विकेट्स गमावून १४६ धावा केल्या. त्यामुळे भारताने या सामन्यात ५० धावांनी विजय मिळवला.

Published by : Naresh Shende

Hardik Pandya on Win Over Bangladesh T20 WC 2024 : टी-२० वर्ल्डकपच्या सुपर ८ मध्ये भारत विरुद्ध बांगलादेश सामना रंगला. शनिवारी झालेल्या या सामन्यात भारतानं बांगलादेशला १९७ धावांचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर या धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेशने २० षटकात ८ विकेट्स गमावून १४६ धावा केल्या. त्यामुळे भारताने या सामन्यात ५० धावांनी विजय मिळवला. बांगलादेशविरोधात झालेल्या सामन्यात भारतासाठी चमकदार कामगिरी करणाऱ्या हार्दिक पंड्याने माध्यमांशी बोलताना मोठं विधान केलं आहे.

काय म्हणाला हार्दिक पंड्या?

मला वाटलं की आम्ही खूप चांगलं क्रिकेट खेळलो. आम्ही एकत्रित खेळलो आणि आमच्या योजनांना चांगल्या पद्धतीने लागू केलं. काही परिस्थितीमध्ये सर्वांना जबाबदारीनं खेळावं लागतं. फलंदाजांना हवेचा वापर करायचा होता, याची मला खात्री झाली. त्यानंतर मी निश्चित केलं की, फलंदाजांना हवेच्या प्रवाहात शॉट मारू द्यायचं नाही.

वर्ल्डकपमध्ये नंबर वन बनला विराट कोहली

बांगलादेशविरोधात ३७ धावांची खेळी केलेल्या विराटने ऐतिहासिक कारनामा करून वर्ल्डकपमध्ये मोठा विक्रम केला आहे. बांगलादेशविरोधात झालेल्या सुपर-८ सामन्यात विराटने ३७ धावांची खेळी करून इतिहास रचला. विराट वर्ल्डकपमध्ये ३ हजार धावा पूर्ण करणारा पहिला खेळाडू बनला आहे. त्याच्यासोबत या लिस्टमध्ये रोहित शर्मा, सचिन तेंडुलकरसह विश्वक्रिकेटमधील अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pune : पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणातील पाच आरोपींना अटक

Asia Cup : भारत-पाकिस्तान सुपर-4 मध्ये पुन्हा आमनेसामने

Latest Marathi News Update live : राज्यात आज ॲलोपॅथी डॉक्टरांचा संप

EVM : आता ईव्हीएम मशीनवर दिसणार रंगीत छायाचित्र; केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय