Pat Cummins
Pat Cummins 
क्रीडा

पॅट कमिन्सने एका ओवरमध्ये कुटल्या 35 धावा, मात्र सर्वाधिक स्कोर 'या' खेळाडूंच्या नावावर

Published by : left

आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या हंगामातील १४ सामना चांगलाच रोमहर्षक ठरला. या सामन्यात पॅट कमिन्सने (Pat Cummins) १५ चेंडूंमध्ये तब्बल ५६ धावा करुन नवा विक्रम रचला आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगवान आणि कमी चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावणारा दुसरा खेळाडू ठऱला आहे. त्याचबरोबर एका ओवरमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा पंक्तीत तो जाऊन बसला आहे. त्याने एका ओवरमध्ये 35 धावा कुटल्या होत्या. मात्र एका सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावावर आहे.

मुंबईने दिलेले १६२ धावांचे लक्ष्य गाठताना कोलकाता संघ अडचणीत सापडला होता. कोलकाताची १०१ धावा पाच गडी बाद अशी स्थिती झाली होती. मात्र रसेल बाद झाल्यानंतर आलेल्या पॅट कमिन्सने (Pat Cummins) पूर्ण सामनाच फिरवून टाकला. मैदावर येताच त्याने चौकार आणि षटकार यांचा अक्षरश: पाऊस पाडला. त्याने अवघ्या १५ चेंडूंमध्ये तब्बल ५६ धावा करून कोलकाताला विजय मिळवून दिला. त्याच्या या कामगिरीमुळे कोलकाता संघाने मुंबईवर पाच गडी आणि तीन षटके राखून दणदणीत विजय मिळवला. या धमाकेदार फलंदाजीनंतर पॅट कमिन्सच्या (Pat Cummins)नावावर अनोख्या विक्रमांची नोंद झाली आहे.

फास्टेस फिफ्टी

पॅट कमिन्सने (Pat Cummins) फक्त १५ चेंडूमध्ये तब्बल ५६ धावा केल्या आहेत. त्याच्या या खेळानंतर तो आयपीएलच्या इतिहासात सर्वात जास्त वेगाने अर्धशतक करणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे. पहिल्या क्रमांकावर केएल राहुल (KL Rahul) असून त्याने दिल्ली कॅपिटल्सविरोधात खेळत असताना १४ चेंडूंमध्ये अर्धशतक केले होते.

ओवरमध्ये सर्वाधिक धावाचा विक्रम

पॅट कमिन्सने (Pat Cummins) मुंबई विरुद्धच्या सामन्यात फक्त १५ चेंडूमध्ये तब्बल ५६ धावा केल्या.यामध्ये त्याने एका ओवरमध्ये तब्बल 35 धावा केल्या. त्यामुळे या हंगामातली एका ओवरमधल्या या सर्वाधिक धावा आहेत. तर याआधीच्या हंगामात अशी कामगिरी अनेक खेळाडूंनी केली आहे. यामध्ये वेस्ट इंडीजचा क्रिस गेल (Chris Gayle) आणि भारताचा रविंद्र जाडेजाचा समोवश आहे. क्रिस गेलने (Chris Gayle) कोची विरुद्धच्या सामन्यात 37 धावा पिटल्या होत्या. तर रविंद्र जाडेजाने (ravindra Jadeja) सुद्धा आरसीबी विरूद्ध एका ओवरमध्ये 37 धावा चोपल्या होत्या.

"भाजप सरकारच्या नादानपणामुळे भारतीय सैनिकांवर हल्ला झाला"; 'मशाल' पेटवून उद्धव ठाकरेंचं PM मोदींवर शरसंधान

IPL 2024 : धरमशाला मैदानात चेन्नई बनला सुपर 'किंग'! पंजाबचा केला दारुण पराभव

"तुतारीची आता पिपाणी करायची आहे"; फलटणच्या सभेत उपमुख्यमंत्री फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल

अलिबागच्या सभेत उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर निशाणा, म्हणाले; "एकनाथ खडसेंचा मला फोन आला आणि..."

"छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला पण आज परिस्थिती बदलली"; शरद पवारांचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा