क्रीडा

Women Cricket: लॉर्ड्सवर प्रथमच महिलांच्या कसोटी सामन्याचे आयोजन; भारत आणि इंग्लंड यांच्यात होणार सामना

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामना 2026 मध्ये लंडनच्या लॉर्ड्स स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे.

Published by : Dhanshree Shintre

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामना 2026 मध्ये लंडनच्या लॉर्ड्स स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. प्रसिद्ध लॉर्ड्स स्टेडिअमवर महिलांच्या कसोटी सामन्याचे आयोजन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) गुरुवारी याची घोषणा केली. भारत आणि इंग्लंडच्या महिला संघांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एकमेव कसोटी सामना खेळला होता.

347 धावांच्या फरकाने पराभव केला होता. लॉर्ड्सने याआधी महिलांचे सामने आयोजित केले आहेत, परंतु ते सर्व मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये आहेत. "भारतीय महिला संघ 2026 मध्ये लॉर्ड्सवर एकमात्र कसोटी सामना खेळेल याची पुष्टी झाली आहे," असे ईसीबीने एका निवेदनात म्हटले आहे. या मैदानावर होणारा हा पहिला महिला कसोटी सामना असेल. गेल्या तीन वर्षांपासून, इंग्लंडचा महिला संघ लॉर्ड्सवर मर्यादित षटकांचे सामने खेळत आहे, परंतु आता प्रथमच या मैदानावर महिलांच्या कसोटी सामन्याचे आयोजन केले जाणार आहे.

भारतीय महिला संघ 2026 मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा करणार आहे. या कालावधीत, भारतीय संघ नॉटिंगहॅममध्ये 28 जूनपासून इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची T20 मालिका खेळणार आहे, त्यातील अंतिम सामना 12 जुलै रोजी खेळवला जाणार आहे. यानंतर 16 ते 22 जुलै दरम्यान भारत आणि इंग्लंड महिला संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका होणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा