IND vs USA, T20 World Cup 
क्रीडा

USA vs IND Live Streaming, T20 WC 2024: भारतात कधी आणि कोणत्या वेळी पाहणार लाईव्ह सामना? वाचा सविस्तर माहिती

भारत आणि यूएसए मध्ये टी-२० वर्ल्डकपचा सामना न्यूयॉर्क येथे रंगणार आहे. आतापर्यंत दोन्ही संघांनी जबरदस्त कामगिरी केली आहे.

Published by : Naresh Shende

India vs USA T20 World Cup : भारत आणि यूएसए मध्ये टी-२० वर्ल्डकपचा सामना न्यूयॉर्क येथे रंगणार आहे. आतापर्यंत दोन्ही संघांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. यूएसएने पाकिस्तान आणि कॅनडाचा पराभव केला आहे, तर भारतानेही पाकिस्तान आणि आर्यलँडला पराभवाची धूळ चारली आहे. भारत आणि यूएसएमध्ये होणाऱ्या सामन्यात जो संघ जिंकेल, तो थेट सुपर ८ मध्ये प्रेवश करेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत आणि यूएसएमध्ये पहिल्यांदाच सामना खेळवला जाणार आहे. यूएसएच्या संघात ८ खेळाडू असे आहेत, जे भारतीय वंशाचे आहेत.

India vs USA, T20 World Cup 2024 चा सामना कुठे खेळवला जाणार?

भारत आणि यूएसए यांच्यातील सामना न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.

India vs USA मध्ये टी-२० वर्ल्डकपचा सामना कधी होणार?

१२ जूनला दोन्ही संघांमध्ये न्यूयॉर्कच्या मैदानावर सामना खेळवला जाणार आहे.

भारतात IND vs USA सामन्याचं प्रक्षेपण कुठे होणार?

स्टार स्पोर्ट्सवर या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट पाहू शकता.

IND vs USA सामना कोणत्या वेळी सुरु होईल?

भारतात हा सामना रात्री ८ वाजता लाईव्ह टेलिकास्ट होईल. नाणेफेक ७.३० वाजता होईल.

IND vs USA यांच्यात लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे होणार?

या सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग हॉट स्टार अॅप (Disney+Hotstar) वर केलं जाईल.

USA अमेरिका : मोनंक पटेल (कर्णधार), आरोन जोन्स (उपकर्णधार), एंड्रीस गौस, कोरी एंडरसन, अली खान, हरमीत सिंग, जेसी सिंग, मिलिंद कुमार, निसर्ग पटेल, नितीश कुमार, नोशतुश केंजीगे, सौरभ नेत्राल्वाकर, शैडली वान शल्कविक, स्टीवन टेलर, शायन जहांगीर

राखीव खेळाडू : गजानंद सिंग, जुआनॉय ड्रिस्डेल, यासिर मोहम्मद

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

राखीव खेळाडू : शुबमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी मनसे आणि शिवसेनेचे नेते वरळी येथील डोम सभागृहात दाखल

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर