क्रीडा

'पुढच्या विश्वचषकात काही चेहरे बघायला मला अजिबात आवडणार नाही', टीम इंडियाच्या वरिष्ठ खेळाडूंबाबत सेहवागचं वक्तव्य

Published by : Siddhi Naringrekar

पुढील टी-२० विश्वचषकातही हाच संघ उतरला आणि त्याच दृष्टिकोनाने खेळला, तर निकालही तसाच लागेल, असे मत भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने व्यक्त केले. पुढील विश्वचषकासाठी संघात काही महत्त्वाचे बदल व्हायला हवेत, असे सेहवागचे म्हणणे आहे. येथे त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही, मात्र ते काही ज्येष्ठ खेळाडूंऐवजी तरुणांना संधी देण्याबाबत बोलत असल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे.

सेहवाग म्हणाला, 'मी मानसिकता आणि इतर गोष्टींबद्दल बोलणार नाही, पण मला या संघात काही बदल नक्कीच आवडतील. मला पुढच्या विश्वचषकात काही चेहरे बघायला आवडणार नाही. T20 विश्वचषक 2007 मध्ये आपण पाहिले की दिग्गज खेळाडू त्या विश्वचषकाला गेले नाहीत.

तरुणांचा एक संघ गेला, ज्याची कोणालाही अपेक्षा नव्हती. मला पुढील विश्वचषकासाठी असाच संघ निवडायचा आहे. यासोबतच तो म्हणाला की, 'मला पुढच्या विश्वचषकात यावेळी चांगली कामगिरी न करणाऱ्या वरिष्ठांना बघायला आवडणार नाही. मला आशा आहे की निवडकर्तेही असाच निर्णय घेतील.

अजित पवार यांच्याकडून रोहित पवार यांची रडण्याची नक्कल; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Amol Kolhe : कांदा निर्यात बंदी जी उठवली ही फसवी निर्यात बंदी उठवली आहे

सुषमा अंधारे यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाल्या...

"भाजप सरकारच्या नादानपणामुळे भारतीय सैनिकांवर हल्ला झाला"; 'मशाल' पेटवून उद्धव ठाकरेंचं PM मोदींवर शरसंधान

IPL 2024 : धरमशाला मैदानात चेन्नई बनला सुपर 'किंग'! पंजाबचा केला दारुण पराभव