29 नोव्हेंबरला चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक निश्चित करण्यासाठी आयसीसीची बैठक झाली मात्र भारताने पाकिस्तानात जाण्यास नकार दिला त्यामुळे या शेड्यूलची घोषणा लांबणीवर पडली. यादरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या 2025 हंगामासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने म्हणजेच आयसीसीने एक हायब्रिड मॉडेलचा प्रस्तावित तयार केला आहे. मात्र पीसीबीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने प्रत्येकवेळेस हायब्रीड मॉडेल स्वीकारणार नाहीत आणि होणारे सर्व सामने हे पाकिस्तानमध्ये खेळले जातील असं सांगितले.
मात्र आता एक मोठी बातमी समोर आली आहे. पीसीबीला तात्पुरते शांत करण्यासाठी आयसीसीने एक योजना काढली आहे ज्यामध्ये भारत जर अंतिम चारसाठी किंवा उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला नाही तर सामने पाकिस्तानमध्येच होतील असं सांगण्यात आलं आहे. हायब्रीड मॉडेलनुसार पाकिस्तानमध्ये 10 सामने आणि दुसऱ्या देशात 5 सामने खेळवले जाणार असून सेमीफायनल आणि फायनलचाही समावेश असेल. मात्र तणाव कमी करण्यासाठी जरी आयसीसीने हा निर्णय घेतला असेला तरी यामुळे लॉजिस्टिक आव्हाने वाढतील अशी शक्यता आहे. मात्र जर पाकिस्तानने आयसीसीला सहमती नाही दिली तर त्यांच्याकडून यजमानपद काढून घेतले जाईल. त्यामुळे यूएईमध्ये ही स्पर्धा आयोजित केली जाऊ शकते.
मात्र मिळालेल्या माहितीनुसार ICC बोर्डाचे बहुतेक सदस्य हायब्रिड सोल्यूशनला समर्थन देत आहेत. आयसीसीने पीसीबीला पहिलाच एक गोष्ट स्पष्ट केली आहे ती म्हणजे, भारताशिवाय चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन केले जाऊ शकत नाही, आणि असं केल्यास आयसीसीचे नुकसान होईल त्यामुळे ते भारताशिवाय चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करणार नाही. पाकिस्तानची प्रतिमा तसेच कोट्यवधी डॉलर्स पणाला लागल्याने तडजोड हाच एकमेव उपाय असू शकतो. भारताला स्पर्धेतून काढून टाकल्यास पाकिस्तानचेही मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.