ICC ODI Ranking 
क्रीडा

ICC ODI Ranking: वनडे रँकिंगमध्ये भारतीय दणका! रोहित नंबर 1; तर विराटने दुसऱ्या स्थानावर मारली झेप, टॉप 10 ची रचना बदलली

ODI Ranking Update: नुकत्याच जाहीर झालेल्या ICC ODI रँकिंगमध्ये रोहित शर्मा अव्वल स्थानी कायम तर विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.

Published by : Dhanshree Shintre

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) नुकतीच जारी केलेल्या एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत विराट कोहलीने दमदार प्रगती करून दुसऱ्या स्थानावर आपली जागा मजबूत केली आहे. गेल्या आठवड्यापर्यंत कोहली चौथ्या स्थानावर होता, मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत केलेल्या अत्यंत प्रभावी कामगिरीमुळे त्याला 773 रेटिंग गुण मिळाले असून तो आता एकदिवसीय विश्वक्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तर रोहित शर्मा 781 गुणांसह अव्वल स्थान कायम राखत आहे, ज्यामुळे आयसीसीच्या या एकदिवसीय क्रमवारीत रोहित-कोहली या जोडीचे वर्चस्व दिसून येते. तिसऱ्या क्रमांकावर डॅरिल मिशेल असून त्याचा गुणसंचय 766 आहे. इब्राहिम झद्रान चौथ्या आणि शुभमन गिल पाचव्या स्थानावर आहेत.

दक्षिण अफ्रिकेविरुद्ध विराट कोहलीच्या 300 हून अधिक धावा

सीरिजमध्ये विराट कोहलीने केलेली कामगिरी अतिशय उल्लेखनीय होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने सलग दोन शतके आणि एक जलद अर्धशतक झळकावले. या मालिकेत कोहलीने एकूण 302 धावा केल्या, ज्यामुळे भारताला 2-1 अशी मालिका जिंकण्यात मदत झाली. या उत्कृष्ट कामगिरीसाठी विराट कोहलीला मालिकावीर म्हणूनही गौरवण्यात आले आहे.

रोहित शर्माचा 20,000 धावांचा टप्पाही गाठला

रोहित शर्मानेही या मालिकेत संपूर्ण संघासाठी मोलाची सुरुवात करून दिली. रोहितने जरी शतक झळकावले नसल्यानाही दोन अर्धशतके करत संघाला विजयाच्या दिशेने नेले. त्याने पहिल्या सामन्यात 57 धावा केल्या तर निर्णायक तिसऱ्या सामन्यात 75 धावांची उज्वल खेळी बजावली. रोहित आणि यशस्वी जैस्वाल याने तिसऱ्या सामन्यात 155 धावांची भागीदारी करत भारताला 271 धावांचे लक्ष्य सहज गाठण्यास मदत केली. या मालिकेत रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20,000 धावांचा टप्पाही गाठला, जे त्याच्या दीर्घकालीन फलंदाजी कारकिर्दीचा मोठा मीलप्रिष्ट आहे.

सामूहिक कामगिरीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका जिंकली आहे आणि विराट कोहली व रोहित शर्मा यांची उत्कृष्ठ कामगिरी भारतीय क्रिकेटसाठी आशेचा किरण आहे. या दोन्ही फलंदाजांनी आपल्या कौशल्याने संघाला जागतिक स्पर्धांमध्ये एक जबरदस्त स्थान मिळवून दिले आहे, आणि आगामी सामन्यांमध्येही त्यांची ही कामगिरी निरंतर राहणे अपेक्षित आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा