क्रीडा

Rohit Sharma VIDEO : रोहितने मारला षटकार चिमुकली झाली जखमी; काळजाचा ठोका चुकवणारा क्षण

भारत आणि इंग्लंड सामना सुरू असताना काळजाचा ठोका चुकवणारे दृश्य दिसले. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला मंगळवारी सुरुवात झाली. या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना केनिंग्टन ओव्हलवर झाला.

Published by : Siddhi Naringrekar

भारत आणि इंग्लंड सामना (INDvsENG) सुरू असताना काळजाचा ठोका चुकवणारे दृश्य दिसले. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला मंगळवारी सुरुवात झाली. या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना केनिंग्टन ओव्हलवर झाला. या सामन्यात रोहीत शर्माने अर्धशतक पूर्ण केलं आणि जसप्रीत बुमराहने सहा बळी घेतले. भारताने या सामन्यात इंग्लंडचा १० गडी राखून पराभव केला.

या सामन्याच्या दरम्यान असे काही घडले की, रोहीत शर्मा देखिल काळजीत पडला. फलंदाजी करत असताना रोहितच्या एका फटक्यामुळे प्रेक्षकांमध्ये बसलेली लहान मुलगी जखमी झाली. चेंडू लागताच ही मुलगी किंचाळू लागली. ही बाब लक्षात येताच मैदानाच्याकडेला उपस्थित असलेल्या इंग्लंड संघाच्या फिजिओने लगेचच त्या मुलीकडे धाव घेतली.

पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या (INDvsENG) दुसर्‍या डावात भारताने फलंदाजी केली. इंग्लंडने दिलेले १११ धावांचे लक्ष पार करण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma ) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) यांनी भारतीय खेळाची सुरुवात चांगली केली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा