क्रीडा

Ind vs NZ Test : न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघ जाहीर, अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपदाची धुरा!

Published by : Lokshahi News

न्यूझीलंड संघ टी-२० वर्ल्डकप संपल्यानंतर थेट भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात न्यूझीलंडसोबत कसोटीसोबत तीन टी-२० सामन्यांचेही आयोजन करण्यात आले आहे. जयपूर, रांची आणि कोलकाता येथे टी २० सामने असतील.

मुंबईकर अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) न्यूझीलंडविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यात कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे. तर उपकर्णधार म्हणून चेतेश्वर पुजाराची निवड करण्यात आली आहे. विश्वचषकानंतर विराट कोहलीनं आराम घेतल्यामुळे कसोटी संघाचं नेतृत्व रहाणेकडे सोपवण्यात आलं आहे. रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शामी आणि ऋषभ पंत यांनाही कसोटीमध्ये आराम देण्यात आलाय. के. एस भरत आणि वृद्धमान साहा यांच्याकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. न्य़ूझीलंडविरोधातील दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहली भारतीय संघात परतणार आहे. त्यानंतर करणधारपदाची सुत्रे विराट कोहलीकडे सोपवण्यात येणार आहेत. 

या दौऱ्यापूर्वी बीसीसीआय नवीन कोचिंग स्टाफची घोषणा करू शकते. विक्रम राठोर फलंदाजी प्रशिक्षक, टी. दिलीप क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आणि पारस म्हाम्ब्रे गोलंदाजी प्रशिक्षक असतील. सध्याचे फलंदाजी प्रशिक्षक राठोर त्यांच्या पदावर कायम राहू शकतात. राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक म्हणून आपल्या नव्या इनिंगला सुरुवात करेल.

न्यूझीलंड कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ:

अजिंक्य रहाणे (कर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), शुबमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशात शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.

कसोटी सामने

पहिला कसोटी सामना- २५ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर, कानपूर
दुसरा कसोटी सामना- ३ डिसेंबर ते ७ डिसेंबर, मुंबई

EVM मशिनला हार घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर शांतीगिरी महाराजांनी दिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले...

मतदानाचा टक्का का घसरला? आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, ट्वीटरवर व्हिडीओ शेअर करत निवडणूक आयोगाला केली 'ही' विनंती

मोठी बातमी! EVM मशिनला हार घातल्याप्रकरणी शांतीगिरी महाराजांवर गुन्हा दाखल

देशासह राज्यात मतदानाचा टक्का घसरला, दुपारी १ वाजेपर्यंत किती टक्के मतदान झालं? जाणून घ्या सविस्तर माहिती

Aaditya Thackeray : मतदानाचा हक्क बजावल्यानंतर आदित्य ठाकरे फोटो शेअर करत म्हणाले...