क्रीडा

IND VS PAK : भारत-पाकिस्तान येणार आमने-सामने; सर्व तिकीटे बुक

भारत-पाकिस्तान संघ मैदानावर आमने-सामने येणार आहे. या सामन्याच्या तिकीट खरेदीसाठी एकच झुंबड झाली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : क्रिडा जगतातून क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी येत आहे. आता पुन्हा एकदा भारत विरुध्द पाकिस्तान (IND VS PAK) सामन्याचा थरार पाहायला मिळणार आहे. यावर्षी टी-20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) भारत-पाकिस्तान संघ मैदानावर आमने-सामने येणार आहे. या सामन्याच्या तिकीट खरेदीसाठी एकच झुंबड झाली आहे.

या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. 16 ऑक्‍टोबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून अंतिम लढत 13 नोव्हेंबर रोजी होणार आहे. अंतिम सामन्याची तिकिटेही जवळपास पूर्ण विकली गेल्याचे सांगण्यात येत आहे.

भारत-पाकिस्तान सामना यंदा दिवाळीच्या एक दिवस आधीच म्हणजे २३ ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर (MCG) होणार आहे. मात्र, याआधीच तीन महिन्यांपूर्वीच या सामन्याची जवळपास सर्व तिकिटे विकली गेली आहेत.

तर, याआधी भारत-पाकिस्तान हे दोन्ही संघ आणखी एक सामना खेळणार आहेत. हा सामना आशिया कप अंतर्गत खेळवला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, याचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही.

दरम्यान, मेलबर्नमधील हॉटेलच्या सर्व खोल्या आधीच रिझर्व्ह झाल्या आहेत. भारत-पाकिस्तान सामन्यासाठी मेलबर्नमध्ये 45 ते 50 हजार चाहते येण्याची शक्तता वर्तविण्यात येत आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pigeon Feeding : नियंत्रित पद्धतीने कबुतरांना खाद्य देण्यासाठी तीन संस्थांनाचे अर्ज

Latest Marathi News Update live : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेवर 2 विशेष गाड्या धावणार; प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा निर्णय

Accident : मुंबईच्या शिवडी येथे शाळेच्या बसचा अपघात; 4 मुलं जखमी

GST मध्ये मोठे बदल ; आता 5 टक्के आणि 18 टक्के असे दोन टप्पे