क्रीडा

पावसामुळे भारत-पाकिस्तान सामना रद्द; सुपर-4मध्ये पुन्हा भिडणार?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे निकालात निघाला नाही. अशा प्रकारे दोन्ही संघांचे 1-1 गुण झाले.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे निकालात निघाला नाही. अशा प्रकारे दोन्ही संघांचे 1-1 गुण झाले. मात्र, पाकिस्तानचा संघ 3 गुणांसह सुपर-4साठी पात्र ठरला आहे. त्याचबरोबर आता भारतीय संघासमोर नेपाळचे आव्हान असणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ नेपाळला हरवून सुपर-4 साठी पात्र ठरेल.

या स्पर्धेतील 6 संघांची 2 गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त नेपाळ ग्रुप-अ मध्ये आहे. तर ब गटात श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांचा समावेश आहे. दोन्ही गटातील 2-2 संघ सुपर-4 साठी पात्र ठरतील. यानंतर, संघ सुपर-4 फेरीत सर्वोत्तम प्रयत्न करतील. मात्र, क्रिकेट चाहत्यांना सुपर-4 फेरीत पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान सामना पाहायला मिळेल. या सुपर-4 फेरीनंतर अंतिम सामना 17 सप्टेंबर रोजी होणार आहे.

दरम्यान, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पाकिस्तानसमोर विजयासाठी 267 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारतीय संघ 48.5 षटकात 266 धावांवर गारद झाला. मात्र त्यानंतर पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही. भारताकडून हार्दिक पांड्याने 90 चेंडूत सर्वाधिक 87 धावा केल्या. याशिवाय ईशान किशनने 81 चेंडूत 81 धावांचे योगदान दिले. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने सर्वाधिक ४ बळी घेतले. याशिवाय हरिस रौफ आणि मोहम्मद नसीम यांना ३-३ यश मिळाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Dhadak 2 Trailer Out : पुन्हा एक हळवी प्रेमकहाणी; 'धडक 2' चा ट्रेलर लाँच

Mediclaim : विमा कंपन्यांकडून आरोग्य विमा क्लेमसाठी 24 तासांची अट शिथिल

Ajit Doval : 'तुमच्याकडे भारतात झालेल्या नुकसानीचा एकतरी फोटो आहे का?'; अजित डोवाल यांचे विदेशी माध्यमांना खुले आव्हान

Latest Marathi News Update live : विधान परिषदेत जनसुरक्षा विधेयकावरून गदारोळ