क्रीडा

IND vs SA 1st ODI : भारताचा पराभव, दक्षिण आफ्रिकानं ३१ धावांनी जिंकला सामना

Published by : Lokshahi News

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. दक्षिण आफ्रिकाने भारताला ३१ धावांनी मात दिली. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. बावुमाने रूसी व्हॅन डर डुसेनसह केलेल्या दोनशे धावांच्या भागीदारीमुळे भारताला २९७ धावांचे आव्हान मिळाले. बावुमा आणि डुसेन यांनी शतके ठोकली. प्रत्युत्तरात भारताचा संघ ५० षटकात ८ बाद २६५ धावांपर्यंतच पोहोचू शकला. विराट कोहली, शिखर धवन आणि शेवटी शार्दुल ठाकूरने अर्धशतके झळकावली, पण मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केली. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा