टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. सामन्याला दुपारी 1.30 वाजता सुरुवात झाली. टॉस दुपारी 1 वाजता झाला, ज्यात पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. टेम्बा बवुमा यांनी फिल्डिंगचा निर्णय घेत भारताला बॅटिंगसाठी आमंत्रित केले.
दक्षिण आफ्रिकेने प्लेइंग ईलेव्हनमध्ये तीन बदल केले आहेत. टेम्बा बवुमा यांचं कमबॅक झालं आहे, तर रायन रिकेल्टन, ओटनील बार्टमॅन आणि प्रिनेलन सुब्रेन यांच्या जागी लुंगी एन्गिडी आणि केशव महाराज यांचा समावेश करण्यात आला आहे. भारताने मात्र आपल्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
टीम इंडियावर टॉस नाराजी
टीम इंडियाची ही सलग टॉस गमावण्याची 20 वी वेळ ठरली आहे. त्यामुळे टीम इंडियाची आणि चाहत्यांची टॉस जिंकण्याची प्रतिक्षा अजून कायम आहे. सामन्याच्या निकालाची आणि भारताच्या बॅटिंगची सर्वांना उत्सुकता आहे.
टीम इंडिया मालिका जिंकणार?
टीम इंडिया सध्या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर असून, दुसरा सामना जिंकताच मालिका खिशात टाकण्याची त्यांना मोठी संधी आहे. उलट दक्षिण आफ्रिकेसाठी हा सामना 'करो या मरो' क्षण ठरणार आहे. कारण त्यांना मालिका 1-1 अशी समसमान राखण्यासाठी विजय आवश्यक आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्याकडे क्रिकेटप्रेमींची उत्सुकता वाढली आहे.