Suryakumar Yadav  Team Lokshahi
क्रीडा

IND vs SL 3rd T20: राजकोटमध्ये सुर्याचं झंझावाती शतक! श्रीलंकेसमोर 229 धावांचे आव्हान

भारत आणि श्रीलंका संघांत तिसरा टी-२० सामना राजकोट येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

Published by : shweta walge

भारत आणि श्रीलंका संघांत तिसरा टी-२० सामना राजकोट येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीलंकेला आता विजयासाठी २२९ धावांची गरज आहे. टीम इंडियाकडून सूर्यकुमार यादवने शानदार फलंदाजी करताना शतक झळकावले. त्याचे हे टी-२० क्रिकेटमधील तिसरे शतक आहे. सूर्यकुमार यादवने ४५ चेंडूत शतक पूर्ण केले. त्यामुळे भारतीय संघाने निर्धारित २० षटकांत २२८ धावा केल्या.

सूर्यकुमार यादवने श्रीलंकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. तर शुभमन गिलनेसुद्धा फटकेबाजी केली. शुभमन गिल ३६ चेंडूत ४६ धावा काढून बाद झाला. त्याने सूर्यकुमार यादवसोबत १११ धावांची भागिदारी केली. शुभमन गिलनंतर हार्दिक पांड्या आणि दीपक हुड्डा हे दोघेही प्रत्येकी चार धावा करून बाद झाले. सूर्यकुमार यादवने ५१ चेंडूत तुफानी ११२ धावांची खेळी केली. या खेळीत सूर्यकुमार यादवने ७ चौकार अन् ९ षटकारांची आतषबाजी केली. तर अक्षर पटेलने ९ चेंडूत ४ चौकारांसह २१ धावा केल्या. यामुळे भारताने २० षटकात ५ बाद २२८ धावा केल्या.

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अद्याप कोणतीच टी२० मालिका गमावलेली नाही. त्यामुळे पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सलग तिसऱ्या मालिका विजयासाठी उत्सुक आहे. भारताने श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानावर एकही मालिका गमावलेली नाही. त्यामुळे मालिका वाचवण्याचे आव्हानही भारतीय संघासमोर असणार आहे.

श्रीलंका संघ: पाथुम निसांका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), धनंजय डी सिल्वा, चरित अस्लांका, अविष्का फर्नांडो, दासुन शनाका (कर्णधार), वनिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महिष तिक्ष्ण, कसून राजिता, दिलशान मधुशंका.

भारतीय संघ; इशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, हार्दिक पंड्या (कर्णधार), दीपक हुडा, अक्षर पटेल, शिवम मावी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Home Remedies To Relieve Mouth Pain : तोंडातील फोडं, जळजळ आणि वेदना? आता मिळवा त्वरित आराम!

Teachers Strike : शिक्षकांची शाळा बंदची हाक, सरकारला दिला आंदोलनाचा इशारा

Latest Marathi News Update live : पुण्यात अमली पदार्थांचा सुळसुळाट

Saif Ali Khan : सैफ अली खानला मोठा झटका – 15 हजार कोटींच्या मालमत्तेवर ‘शत्रू मालमत्ते’चा शिक्का