India Vs Australia One day Series Team Lokshahi
क्रीडा

ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; असा असेल संघ

मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित शर्मा वैयक्तिक कारणांमुळे संघाचे नेतृत्व करणार नाही, तर त्याच्या जागी हार्दिक पांड्याकडे त्याच्या जागी संघाचे नेतृत्व करेल.

Published by : Sagar Pradhan

सध्या भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका सुरु आहे. ही मालिका संपल्यानंतर आता या दोन्ही संघात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळवली जाणार आहे. याच एकदिवसीय मालिकेसाठी आता बीसीसीआयने आज भारतीय संघाची घोषणा केली आहे. परंतु, मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित शर्मा वैयक्तिक कारणांमुळे संघाचे नेतृत्व करणार नाही, तर त्याच्या जागी हार्दिक पांड्याकडे त्याच्या जागी संघाचे नेतृत्व करेल.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत केएल राहुलसोबत विराट कोहली आणि अनेक मोठ्या खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. दरम्यान यावर्षी भारतीय संघाने दोन संघांविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळली गेली. या दोन्ही मालिकेत भारताने उत्कृष्ट कामगिरी केली. मात्र, या एकदिवसीय मालिकेत कर्णधार रोहित शर्मा शेवटच्या २ सामन्यांसाठी संघात सामील होईल.

असा असेल ऑस्ट्रेलियाविरुद्धचा एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल आणि जयदेव उनाडकट.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विधान परिषदेत जनसुरक्षा विधेयकावरून गदारोळ

Dhadak 2 Trailer Out : पुन्हा एक हळवी प्रेमकहाणी; 'धडक 2' चा ट्रेलर लाँच

Mediclaim : विमा कंपन्यांकडून आरोग्य विमा क्लेमसाठी 24 तासांची अट शिथिल

Ajit Doval : 'तुमच्याकडे भारतात झालेल्या नुकसानीचा एकतरी फोटो आहे का?'; अजित डोवाल यांचे विदेशी माध्यमांना खुले आव्हान