IND vs ENG U19 World Cup Final 
क्रीडा

IND vs ENG U19 World Cup Final: U19 वर्ल्डकपचा भारत विजेता, भारताचा इंग्लंडवर 100 रन्सने विजय

Vaibhav Suryavanshi: भारताने U19 विश्वचषक २०२६ अंतिम सामन्यात इंग्लंडला १०० धावांनी पराभव दिला. वैभव सूर्यवंशीच्या १७५ धावांच्या धमाकेदार खेळीवर आधारित विजय, आर.एस. अंब्रिसला मॅन ऑफ द मॅच, भारताने दुसरे जेतेपद जिंकले.

Published by : Dhanshree Shintre

अंडर-१९ विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडला १०० धावांनी पराभव करत ऐतिहासिक जेतेपद पटकावले. हरारे येथील स्पोर्ट्स क्लब मैदानावर खेळल्या गेलेल्या या रोमांचक लढतीत भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करत ९ गडी गमावून ४११ धावा केल्या. प्रतिउत्तरात इंग्लंड ४०.२ षटकात ३११ धावांवर गारद झाला. स्फोटक सलामीवीर वैभव सूर्यवंशीच्या १७५ धावांच्या जोरावर भारताने विजय मिळवला.

भारतीय संघाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर वैभव सूर्यवंशीने ८० चेंडूत १५ चौकार आणि १५ षटकारांसह १७५ धावांची जबरदस्त खेळी केली. कर्णधार आयुष म्हात्रेने ५१ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह ५३ धावा केल्या, तर अभिज्ञान कुंडूने ४० धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून जेम्स मिंटोने ३ विकेट्स, अॅलेक्स ग्रीन आणि सेबॅस्टियन मॉर्गन यांनी प्रत्येकी २, तर मॅनी लुम्सडेनने १ विकेट घेतली.

४१२ धावांचे लक्ष्य असताना इंग्लंडची सुरुवातच खराब झाली. १९ धावांवर जोसेफ मूर्स बाद झाला. बेन डॉकिन्स आणि बेन मेयेस यांनी ७४ धावांची भागीदारी रचली, पण मेयेस ४५ धावांवर खिलन पटेलकडून बाद झाला. १४२/२ वरून १७४/७ पर्यंत घसरगुंडी उडाली. डॉकिन्सने ५६ चेंडूत ६६ धावा केल्या, पण आयुष म्हात्रेने त्याला बाद केले. थॉमस रीव्हजने ३१ धावा केल्या, तर कॅलेब फॉकनरने ६७ चेंडूत ११५ धावांची शानदार झुंज दिली, पण कनिष्क चौहानने त्याला बाद करत विजय निश्चित केला. राल्फी अल्बर्ट, फरहान अहमद, सेबॅस्टियन मॉर्गन ० धावांवर, जेम्स मिंटो २८ वर आणि मॅनी लुम्सडेन ३ वर बाद झाले. अॅलेक्स ग्रीन ० वर नाबाद राहिला.

भारताकडून आर.एस. अम्ब्रिसने ३ विकेट्स घेत मॅन ऑफ द मॅच ठरला. दीपेश देवेंद्रन आणि कनिष्क चौहान यांनी प्रत्येकी २, तर खिलन पटेल आणि आयुष म्हात्रे यांनी १ विकेट घेतली. या विजयाने भारताने उ-१९ विश्वचषकात दुसरे जेतेपद मिळवले आणि चाहत्यांना आनंदाची पर्वणी घालवली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा