लोकशाही न्यूज नेटवर्क | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. भारताला विजयासाठी 381 धांवाची गरज आहे. त्यामुळे भारत ही मोठी धावसंख्या पूर्ण करतो का याकडेचं साऱ्यांचे लढ लागलेय.
इंग्लंडने टीम इंडियाला विजयासाठी 420 धावांचे आव्हान दिले आहे. भारताने चौथ्या दिवसखेर 1 विकेट गमावून 39 धावा केल्या होत्या. कसोटी सामन्यातील पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाने 1 बाद 39 धावांपासून खेळाला सुरुवात केली आहे. चेतेश्वर पुजारा आणि शुबमन गिल मैदानात खेळत आहेत. त्यामुळे आज पाचव्या आणि शेवटच्या दिवशी भारताला विजयासाठी आणखी 381 धांवाची आवश्यकता आहे.तर इंग्लंडलाही भारताला पराभूत करण्यासाठी 9 विकेट्सची गरज आहे