Team Lokshahi
क्रीडा

India versus England T20 series : भारतीय संघाचा पराभव; अखेरच्या सामन्यात इंग्लंड १७ धावांनी विजयी

भारतीय संघाला रविवारी तिसऱ्या आणि अखेरच्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात इंग्लंडकडून १७ धावांनी पराभव पत्करावा लागला. सूर्यकुमार यादवच्या (५५ चेंडूंत ११७ धावा) दिमाखदार शतकानंतरही भारतीय संघाचा पराभव झाला.

Published by : Siddhi Naringrekar

भारतीय संघाला रविवारी तिसऱ्या आणि अखेरच्या ट्वेन्टी-२० (India versus England T20 series) क्रिकेट सामन्यात इंग्लंडकडून (England) १७ धावांनी पराभव पत्करावा लागला. सूर्यकुमार यादवच्या (५५ चेंडूंत ११७ धावा) दिमाखदार शतकानंतरही भारतीय संघाचा पराभव झाला.

इंग्लंडने दिलेल्या २१६ धावांच्या लक्ष्याचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) (११), विराट कोहली ( Virat Kohli ) (११) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) (१) बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमार आणि श्रेयस अय्यर (२८) या फलंदाजांनी भारताचा डाव सावरत चौथ्या गडय़ासाठी ११९ धावांची भागीदारी रचली.

सूर्यकुमारने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील त्याचे पहिले शतक पूर्ण केलं. त्याने शतकी खेळीत १४ चौकार आणि सहा षटकार लगावले. मात्र, इतर फलंदाजांची त्याला फारशी साथ न मिळाल्याने भारताला २० षटकांत ९ बाद १९८ धावातच समाधान मानावे लागले.

मात्र, पहिल्या दोन सामन्यांत विजय मिळवल्याने भारताने या मालिकेत २-१ अशी सरशी साधली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मनसे - शिवसेनेचा आज मुंबईत विजयी मेळावा

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या कामांना यश मिळण्याची शक्यता , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?