India vs South Africa, T20 World Cup 2024 
क्रीडा

India vs South Africa, T20 World Cup Final: विश्वकप जिंकणाऱ्या चॅम्पियन संघावर पडणार पैशांचा पाऊस; इतर संघांनाही मिळणार 'इतके' कोटी रुपये

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-२० वर्ल्डकपचा अंतिम सामना बारबाडोसच्या मैदानात रंगत आहे. जगातील तमाम क्रिकेट चाहत्यांचं लक्ष्य या फायनलच्या सामन्याकडे लागलं आहे.

Published by : Naresh Shende

World Cup Champion Gets Huge Money : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-२० वर्ल्डकपचा अंतिम सामना बारबाडोसच्या मैदानात रंगत आहे. जगातील तमाम क्रिकेट चाहत्यांचं लक्ष्य या फायनलच्या सामन्याकडे लागलं आहे. दोन्ही संघांनी एकही सामना न गमावता फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आज जो संघ चॅम्पियन बनेल, त्या संघावर कोट्यावधी रुपयांचं बक्षिस मिळणार आहे. आयसीसीने यावेळी टी-२० वर्ल्डकपसाठी आतापर्यंतचं सर्वात मोठी रक्कम (११.२५ मिलियन डॉलर) घोषित केली आहे. भारतीय रुपयांमध्ये ही रक्कम ९३.८० कोटी रुपये इतकी आहे. विजेत्या संघासह इतर संघांना किती रुपये मिळणार आहेत, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

विजेता संघ होणार मालामाल

दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात जो संघ विजयी होईल, त्या संघाला कोट्यावधी रुपये मिळणार आहेत. वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाला २.४५ मिलियन डॉलर म्हणजे जवळपास २०.४२ कोटी रुपयांचं बक्षिस मिळणार आहे. तसच उपविजेत्या संघालाही चांगली रक्कम मिळणार आहे. फायनलमध्ये पराभव झालेल्या उपविजेत्या संघाला १.२८ मिलियन डॉलर म्हणजेच १०.६७ कोटी रुपये मिळणार आहेत.

सेमीफायनलिस्टही होणार खूश

अफगानिस्तानच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला असून या संघाला फायनलमध्ये जागा पक्की करता आली नाही. परंतु, शेवटच्या चारमध्ये पराभव झालेला इंग्लंड आणि त्या संघाला ७,८७,५०० डॉलर म्हणजेच ६.५६ कोटी रुपये मिळतील. प्रत्येक संघाला एव्हढी मोठी रक्कम दिली जाईल.

सुपर-८ राऊंडमध्ये असणाऱ्या संघांनाही मिळणार पैसै

ग्रुप स्टेजपासून आठ संघांनी पुढच्या फेरीत जागा बनवली होती. या राऊंडमधून बाहेर झालेल्या प्रत्येक संघाला ३,८२,५०० अमेरिकन डॉलर म्हणजेच जवळपास ३.१८ कोटी रुपये मिळतील. तसच फायनल आणि सेमीफायनल सोडून प्रत्येक सामने जिंकणाऱ्याला वेगळे ३१, १५४ डॉलर म्हणजेच २६ लाख रुपये आयसीसीकडून मिळतील.

उर्वरित संघांचाही खिसा भरणार

अव्वल आठनंतर राहणाऱ्या संघांनाही पैशांचं बक्षिस मिळणार आहे. नवव्या ते बाराव्या नंबरवर राहणाऱ्या संघांना प्रत्येकी २,४७,५०० डॉलर म्हणजेच २.०६ कोटी रुपये मिळतील. तर १३ ते २० नंबरवर आलेल्या संघाला २,२५,००० डॉलर म्हणजेच १.८७ कोटी रुपये बक्षिस म्हणून मिळतील.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मराठीसाठी भांडणाऱ्यांना गुंड म्हणत असतील तर आम्ही गुंड आहोत - उद्धव ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Family Member Vijayi Melava : सहकुटुंब सहपरिवार..; ठाकरे बंधूंचे कुटुंब एकाच व्यासपीठावर

Latest Marathi News Update live : व्यावसायिक सुशील केडियाने मागितली माफी

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्यावर मराठी कलाकारांची भावनिक प्रतिक्रिया