India vs Australia Test
India vs Australia Test Team Lokshahi
क्रीडा

उद्यापासून भारत वि. ऑस्ट्रेलिया कसोटी मलिकेला होणार सुरुवात; असे असतील संभाव्य संघ?

Published by : Sagar Pradhan

श्रीलंका आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांविरोधात उत्कृष्ट कामगिरी केल्यानतंर आता भारतीय संघ ऑस्ट्रेलियासोबतच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेला गुरुवारी 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार. 4 सामन्यांच्या या कसोटी मालिकेला उद्यापासून सुरुवात होईल. मालिकेतील सलामीचा सामना नागपूरमध्ये विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघासाठी ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. या सामन्याला उद्या सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

भारत वि. ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिली कसोटी, 9-13 फेब्रुवारी, नागपूर

दुसरी कसोटी, 17-21 फेब्रुवारी, नवी दिल्ली

तिसरी कसोटी, 1-5 मार्च, धर्मशाळा

चौथी कसोटी, 9-13 मार्च, अहमदाबाद

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

भारतासोबतच्या कसोटी सामन्यासाठी असा असेल ऑस्ट्रेलिया संघ

पॅट कमिन्स (कर्णधार), डेविड वॉर्नर, एश्टोन एगर, स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, पीटर हॅंडस्कॉम्ब, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लांस मॉरिस, टॉड मरफी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क आणि मिशेल स्वीपसन.

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

"देशभक्त शब्दावर आक्षेप घेणारे फडणवीस देशद्रोही आहेत"; उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार

Shivsena UBT : ठाकरे गट -भाजप कार्यकर्ते भिडले, कोटे समर्थकांनी पैसे वाटल्याचा ठाकरे गटाचा आरोप

"मोदींनी काँग्रेसचा कलंक संपवून अयोध्येत राम मंदिर उभारलं"; उत्तर प्रदेशचे CM योगी आदित्यनाथ यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Manoj Jarange Patil : 4 तारखेला उपोषण करणार म्हणजे करणार