India vs Bangladesh, T20 World Cup 
क्रीडा

T20 World Cup 2024: भारत-बांगलादेशमध्ये 'रन'धुमाळी; सामना कुठे, कधी अन् केव्हा पाहणार? जाणून घ्या सविस्तर माहिती

१ जूनला भारत आणि बांगलादेश यांच्यात वॉर्म अप मॅच रंगणार आहे. तर ५ जूनला टीम इंडिया आर्यलँड विरोधात या वर्ल्डकपचा पहिला सामना खेळणार आहे.

Published by : Naresh Shende

T20 World Cup 2024 India vs Bangladesh Warm-up Match : भारतीय संघ टी-२० वर्ल्डकपसाठी अमेरिकेत पोहोचला आहे. भारताचे पहिल्या बॅचमधील जास्तीत जास्त खेळाडू अमेरिकेला पोहोचले आहेत. विराट कोहली आणि हार्दिक पंड्या पहिल्या बॅचसोबत अमेरिकेत गेले नाही. रिपोर्टनुसार, ३० मे पर्यंत कोहली आणि पंड्या अमेरिकेत पोहोचणार आहेत. भारताला यावेळी एकच वॉर्म अप मॅच खेळायचा आहे. १ जूनला भारत आणि बांगलादेश यांच्यात वॉर्म अप मॅच रंगणार आहे. तर ५ जूनला टीम इंडिया आर्यलँड विरोधात या वर्ल्डकपचा पहिला सामना खेळणार आहे. या टी-२० वर्ल्डकपआधी १६ सामने खेळवण्यात येणार आहेत. इंग्लंड, पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा संघ वॉर्म अप सामने खेळणार नाही.

भारताचा वॉर्म अप सामना

१ जून - भारत विरुद्ध बांगलादेश, रात्री ८ वाजता (भारतीय वेळेनुसार)

भारतात लाईव्ह सामना कसा पाहणार?

क्रिकेटप्रेमी भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि हॉटस्टार अॅपवर लाईव्ह सामना पाहू शकतात.

भारताचा वॉर्म अप सामना कोणत्या स्टेडियममध्ये खेळवला जाईल?

भारत आणि बांगलादेश यांचा वॉर्म अप सामना न्यूयॉर्कच्या नसाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाईल.

टी-२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचा स्क्वॉड : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकिपर), संजू सॅमसन (विकेटकिपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदिप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

राखीव : शुबमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान

टी-२० वर्ल्डकपसाठी बांगलादेशचा संघ

नजमुल हुसैन शांतो (कर्णधार), तस्कीन अहमद, लिटन दास, सौम्या सरकार, तंजीद हसन तमीम, शाकिब अल हसन, तौहीद हृदोय, महमूद उल्लाह रियाद, जेकर अली अनिक, तनवीर इस्लाम, शक महेदी हसन, रिशाद हुसैन, मुस्तफिजून रहमान, शोरफुल इस्लाम, तंजीम हसन साकिब

राखीव : अफीफ हुसैन, हसन महमूद

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज्यात आज ॲलोपॅथी डॉक्टरांचा संप

Pune : पुण्यात कोथरूडमध्ये मध्यरात्री गोळीबार; एकजण गंभीर जखमी

Latest Marathi News Update live : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींनी घाईघाईने निर्णय घेऊ नका, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य